नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, साडे तीन मुहूर्तांपैकी गुढी पाडवा हा एक मुहूर्त आहे. हा दिवस शुभ कार्य सुरु करण्यासाठी उत्तम मानला जातो. यंदा गुढी पाडव्याला ग्रहांचा अनोखा मेळा पाहायला मिळणार आहे.
चैत्र नवरात्र उत्सव 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या दिवशी गुढीपाडवा असून मराठी नववर्षांची सुरुवात होणार आहे. हिंदू नववर्ष संवत् 2080 सुरु होणार आहे. या दिवशी ग्रहांचा अनोखा मेळ राशीमंडळात पाहायला मिळणार आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला एक गुढीपाडवा आणि त्यात ग्रहांची अनुकूल स्थिती यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. नववर्षात दोन राजयोग तयार होणार आहे. बुधादित्य आणि गजकेसरी योगाने नववर्षांची सुरुवात होणार आहे. तसेच मीन राशीत पाच ग्रहांचा मेळा बसणार आहे.
चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 रोजी रात्री 10:52 पासून सुरू होईल आणि 22 मार्च 2023 रोजी रात्री 08:20 वाजता समाप्त होईल.
उदयतिथीनुसार 22 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 22 मार्च 2023 रोजी सकाळी 06:29 ते 07:39 ही वेळ पूजेसाठी शुभ राहील.
मीन राशीत गुरुसोबत सूर्य, बुध, चंद्र आणि नेपच्युन हे ग्रह असणार आहे. या स्थितीची राशीचक्रातील सर्वच राशींवर परिणाम दिसून येईल. पण तीन राशींच्या या स्थितीमुळे आर्थिक फायदा होणार आहे. तीन राशींना धनलाभ आणि त्यांची आर्थिक उन्नती होणार आहे.
धनु राशी – या राशीची नुकतीच साडेसाती संपली आहे. त्यात नव वर्ष या राशीसाठी अनुकूल आहे. कारण दोन योग या राशीच्या गोचर कुंडलीतील चतुर्थ भावात तयार होत आहे.
त्यामुळे या काळात सुख आणि समृद्धीत वाढ होण्याची शक्यता आहे. जमिनीसंदर्भातील व्यवहार निश्चित होईल. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. त्याचबरोबर या स्थितीची नजर दशम स्थानावर आहे.
त्यामुळे काही कामात अपेक्षित फळ मिळेल.राजयोग आपल्या कुंडलीच्या चतुर्थ स्थानी तयार होत आहेत यामुळे आपल्याला येत्या काळात सुख व वैभवात वाढ झाल्याचे दिसून येऊ शकते.
या काळात आपले आजार दूर होण्याची चिन्हे आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू येणाऱ्या काळात उजळून येतील यामुळे तुमचा प्रभाव वाढू शकतो. पदोन्नती व पगारवाढीची संधी सुद्धा लाभू शकते.
येत्या काळात तुम्हाला चैनीच्या वस्तू खरेदी करता येतील. जी मंडळी रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांना येत्या काळात आर्थिक स्रोत वाढल्याचे जाणवू शकते.
सिंह राशी – या राशीच्या जातकांना साडेसाती किंवा अडीचकीचा प्रभाव नाही. त्यात दोन राजयोग या राशीला आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाणारे आहेत. जे लोक रिसर्च संदर्भात काम करत आहेत
त्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल. भागीदारीच्या धंद्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घेण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.नववर्ष हे सिंह राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते.
बुधादित्य व गजकेसरी राजयोग हा आपल्या राशीच्या अष्टम स्थानी तयार होत आहे. येत्या काळात सिंह राशीस करिअरची नवी दिशा उलगडून अभ्यासण्याची संधी मिळेल. तुम्हाला कुटुंबासह प्रवासाचे योग आहेत.
तुम्हाला वेळ वाचवण्याचे मार्ग शोधावे लागतील . धार्मिक कामात तुमचा सहभाग वाढू शकतो तसेच व्यवसायिकांना सुद्धा चांगला धनलाभ होऊ शकतो.
मिथुन राशी – या राशीची नुकतीच शनिच्या अडीचकीतून सुटका झाली आहे. त्या या राशीसाठी ग्रहमान अनुकूल आहे. दोन्ही राजयोग गोचर कुंडलीतील दशम स्थानात तयार होत आहेत. त्यामुळे जातकांना हा काळ आनंदाचा जाईल.
नोकरी करणाऱ्या व्यक्तींचं या काळात इन्क्रिमेंट किंवा प्रमोशन होऊ शकतं. वडिलोपार्जित जमिनीतून फायदा होऊ शकतो.शनीची साडेसाती जानेवारीत दूर झाली आहे. अशात आता हिंदू नववर्षाची सुरुवात आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकते.
या वर्षात गुरु ग्रह आपल्या राशीच्या लाभ स्थानात असणार आहेत. तर वर्षाच्या उत्तरार्धात सूर्यदेव लाभस्थानी असणार आहे. बुधादित्य व गजकेसरी राजयोग आपल्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानी तयार होत आहेत.
येत्या काळात मिथुन राशीच्या मंडळींना नोकरीच्या नव्या संधी लाभू शकतात. तसेच तुम्हाला सध्याच्या कार्यस्थळी प्रचंड मान-सन्मान सुद्धा लाभू शकतो. गुढीपाडव्यानंतर पाच दिवसातच तुम्हाला प्रचंड धनलाभाचे योग आहेत.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.