नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालिरिती, मान्यता आहेत. आपल्या देशात शेकडो मंदिरे आहेत. विविध धर्म, जाती, पंथ एकत्रितपणे भारतात नांदतात. धर्म, विचार, पद्धती, चालिरिती, परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी एक गोष्ट समान आहे.
ती म्हणजे नामस्मरण. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे, ती व्यक्ती भगवंतांचे नामस्मरण नेहमी करत असते. नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे. देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे. नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार आहे.
नापजप हा कोणालाही हानिकारक नाही. नामजपाला वयाचे बंधन नसते. नामजप कुठेही करता येतो. त्याला खास विशिष्ट स्थळ हवे, असे काही नाही. नामजपाला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते, अशी मान्यता आहे.
नामजपासाठी सोवळे-ओवळे पाळायची आवश्यकता नाही. नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो.
नामस्मरण करताना माळे संबंधी या काही गोष्टी ज्या आहेत त्यांचं काटेकोरपणे पालन केले तर अधिक लाभदायक ठरू शकतात नाहीतर आपल्या जपाचा शुभ परिणाम न होता निष्फळ ठरतो.
विविध प्रकारच्या जपमाळा आपण वापरतो. ही जप माळ अनेकदा तुळशीची असते, रुद्राक्षांची असते, तर अनेक लोक स्फटिकांची जप माळ देखील वापरतात.
जप माळ कोणतीही असुद्या त्या जप माळेचे काही नियम आपण कटाक्षाने पाळा. नाहीतर त्याचे दुष्परिणाम होतात. जप माळे विषयी हिंदू धर्म शास्त्र अस मानत की कोणत्या मंत्राचा जप करण्यासाठी जर आपण जप माळेचा वापर केला तर त्याच फळ हे कित्येक पटीने प्राप्त होत.
शक्यतो मंत्रांचा जप हा जप माळेवरच करावा.मात्र जप करताना एकाच माळेवर भिन्न देवदेवतांचे जप जपू नयेत. हा आहे पहिला नियम.कारण एकाच माळेवर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मंत्रांचा जप करण्यास हिंदू धर्मशास्त्र मनाई करत.
मात्र जर तुमची इच्छा असेलच तर आपण एकाच माळेवर वेगवेगळ्या देवीदेवतांचा जप करू शकता. मात्र सौम्य आणि उग्र अशा दोन देवतांच्या मंत्रांचा एकत्रित जप एका माळेवर आपण करू नये.
दुसरी गोष्ट अशी की आपली जी माळ आहे ती दुसऱ्या कोणाच्या हाती जाणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या. तिसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जपमाळ कधीच खुंटीला अडकून ठेऊ नका.तिच्यासाठी एखादा बॉक्स करू शकता,
पिशवीत घालून ठेवा पण अडकवू नका. यानंतर आपल्या जप माळेचा कधीच अपमान करू नका,अपशब्द वापरु नका,वाईट विचार करू नका.
यानंतरची महत्वाचे म्हणजे जपमाळ एक दैवी तत्व मानले जाते म्हणून जपाला बसण्यापूर्वी आपण जपमाळे ची पूजा करा, दररोज नित्यनियमाने त्या माळेवरती एक फुल अवश्य वाहा.
जप माळेच महत्व खूप मोठं आहे. खरं तर जप माळेमुळे जप किती झाला आपण किती मंत्र बोललो हे आपल्याला अगदी अचूक कळत आणि ही माळ तुळशी पासून,
रुद्राक्षांपासून बनली असल्याने पवित्र वस्तूंच सानिध्य आपल्याला सहजपणे प्राप्त होत. मन चलबिचल होत नाही,मोजत बसावे लागते नाही.
आपण जेव्हा जप करतो तेव्हा अंगट्या मध्ये आणि बोटांमध्ये जे घर्षण निर्माण होत त्यातून निर्माण होणारी शक्ती ही विलक्षण असते. ती आपल्या शरीरातील नसांद्वारे आपले हृदय प्रभावित करते.
आपल्या मनाची एकाग्रता वाढवते. जी व्यक्ती मरते वेळी आपल्या मुखामध्ये आपण आयुष्यभर घेतलेलंच नाव म्हणजे आपण आयुष्यभर जो मंत्र जपलेला आहे तोच मंत्र ज्या व्यक्तीच्या तोंडात असतो त्या व्यक्तीला मुक्ती अगदी सहजपणे मिळते.
जपमाळे मध्ये सुरुवातीला मोठा मेरू मणी असतो, दुकानदाराला तुम्ही विचारू शकता, तो मणी जप करताना कधीच ओलांडू नये. तसेच करंगळी आणि अंगठ्या शेजारील बोट यांचा वापर जप करताना चुकूनही करू नये, ते निरर्थक होते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.