नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपण दिवसभर इतकी कामे करतो, कष्ट करत असतो, काम करताना कुणी जप करत कुणी नाही करत, कळत नकळत काही चुका, पाप, चुकीच्या गोष्टी घडत असतात.
त्यांचं समर्थन न करता, पुनरावृत्ती न करता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी, यालाच कबुली म्हणतात, तसेच आपल्या जीवनातील या गोष्टी त्या त्या वेळी प्रायश्चित्त केल्यास मन शांत होईल अथवा निराशा जाणवेल.
स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. याशिवाय ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे.हा मंत्र जप करून अनेक लोकांचे जीवन सार्थकी लागले,असे सांगितले जाते.
त्यामुळे अशक्यही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ ‘श्री स्वामी समर्थ’ असा नामोच्चार केला, तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते. स्वामींना जगात अशक्य अस काहीच नाही;
स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा विश्वास स्वामींवर असायला हवा. मानवी जीवनात प्रत्येकाला सुख आणि दुःखाचा सामना करावा लागतो. प्रत्येकाचे आयुष्य हे एकसारखे नसते.
प्रत्येक दिवस हा काही वेगळे शिकवुन जातो. कधी कधी आपल्या जीवनात आनंद मिळतो तर कधी दुख मिळत असते. सुख आणि दुःख हे एकामागुन एक येतच असतात त्याने निराश, खचून चालत नाही त्याचा धैर्याने सामना करावा लागतो.
प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनात कायम सुख समृद्धी राहावी त्यासाठी काही उपाय आहेत ते पूर्ण श्रद्धा ठेवून केले तर तुमच्या अडचणी दूर होतील. रात्री झोपण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही देवघरात स्वामींसमोर अशी प्रार्थना करावी.
रात्री झोपताना स्वामींचे आशीर्वाद घेण्यासाठी ही प्रार्थना नक्की करा. स्वामींच्या चरणी रोज अशी प्रार्थना करा. स्वामी माझे मन विचलित होऊ देऊ नका, आणि जे सेवा करून घेत आहे, त्यात खंड पडू देऊ नका, नकळत काही चुका होत असतील,
तर त्या चुकांची योग्य शिक्षा मला आपण द्यावी, माझ्या मनात कोणाविषयी द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. हे स्वामी राया कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या,
आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि ह्या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा, आणि तुम्ही सतत आमच्यासोबत असेच राहा, आमच्या पाठीमागे रहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवू दया,
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ही अशी छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी जवळ एकदा नक्की बोलायला शिका. अशी प्रार्थना करून झोपाल तर झोप चांगली येईल,
दिवस चांगला निघेल आणि तुमचे सगळे काम होतील, स्वामी सतत तुमच्या सोबत राहतील त्यासाठी तुम्ही प्रार्थना नक्की बोला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामीजी आपल्या भक्तांवर नेहमीच प्रसन्न व संतुष्ट असतात.
त्यामुळे नेहमीच स्वामींच्या नियमांचं पालन आपण करावं आपल्याला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. नित्य असे केल्यास स्वामींची गुरुकृपा पाठीशी राहील, घरातील वातावरण प्रसन्न राहील,
सर्वकाही ठीक व चांगले राहील, ज्यामुळे कितीही संकटे आली तरी त्यांना सामोरं जाण्याचं बळ अंगी भेटेल. स्वामी नेहमीच त्यांच्या भक्तांवर प्रसन्न राहतात, त्यांच्या प्रयत्नात साथ देतात व यश देतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.