नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, दिवसभर दगदग केल्यावर शरीराला पुरेशी विश्रांती आणि झोप ही मिळणे आवश्यक आहे. झोप व्यवस्थित लागत नसेल तर आपला संपूर्ण दिवसभरात त्याचा आळस निघतो.
तसेच त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होत असतो . म्हणून चांगली झोप हा आरोग्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. पण, तुम्हाला झोपेत सतत वाईट स्वप्न पडत असतील तर किंवा यामुळे तुमचं कामावर लक्ष केंद्रित होत नसेल.
अशा समस्या असल्यास तुम्हाला पडणाऱ्या वाईट स्वप्नांमुळे मानसिक आरोग्याशी निगडीत आजार होऊ शकतो.
त्यामुळे तुम्ही हा स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला हा उपाय करणे आवश्यक आहे.
आपल्या पैकीं बर्याच सेवेकर्यांना तसेच बऱ्याच लोकांना रात्री भीती वाटते. कित्येक लोकांना भयानक स्वप्न त्रास देतात . यामध्ये घरात चोर येणे ,चोरी होणे ,आपली नोकरी
जाण्याची भीती तसेच उद्या काय होईल याची भीती असते. याशिवाय इतर कोणत्याही प्रकारची भीती ही सतत आपल्याला रात्री वाटत असेल तर अशा सेवेकर्यांसाठी किंवा
आपल्या सगळ्यांसाठी एक प्रभावी स्तोत्रवाचन केल्यास ही भीती कायमची नाहीशी होईल.तसेच ज्या लोकांना रात्री भयानक स्वप्न पडले असतील तर त्यानीही हा उपाय करावा.
त्यांनी रोज हे स्तोत्र वाचल्यास या समस्या दूर होतील.पण हे स्तोत्र वाचायचे काही नियम सांगितले आहेत.
त्यामध्ये हे स्तोत्र रोज संध्याकाळी 7 नंतर वाचन करायचे आहे. तसेच रोज एक वेळ तरी रोज संध्याकाळी 7 नंतर वाचायचा आहे.
तसेच हे स्तोत्र वाचन केल्यास आपल्या रात्रीच्या समस्या दूर होतात त्यामुळे या स्तोत्राला अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणतात.
म्हणून याचे वाचन नियमित करायचे आहे. आता पुस्तक हे तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल किंवा ऑनलाइन ही मिळतील.
स्वामी स्तोत्र आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते. हे रोज रात्री सात नंतर तीन वेळेस वाचन केल्यास त्याने रात्री भीती वाटणार नाही तसेच भयानक स्वप्न पडणार नाही,
उद्या काय होईल याची चिंता तुम्हाला भेडसावणार नाही , प्रत्येक गोष्ट तुमच्या सोबत शुभ होईल.
अनामिक भीती कायमची निघून जाईल, त्यामुळे वाईट स्वप्न पडणार नाहीत परिणामी तुमची झोप शांत व सकाळ व पुढचा दिवस चांगला जाईल.
म्हणून स्वामींचे चिंतन करावे, स्वामींचे उपाय आपलं जीवन आनंदमय बनवतात. आपल्या जिवनात असणाऱ्या सर्व समस्या नष्ट होतील. श्री स्वामी समर्थ
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.