नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामींची लीला अगाध आहे. स्वामी महाराज अनेक संकटातून मुक्ती देतात पण आधी कठोर परीक्षा घेतात. त्यामुळे हार मानायची नाही. मला आलेला स्वामींचा अनुभव मी तुम्हाला आता संगत आहे.
गेल्या दिवाळी पासून आमच्या घरावर अनेक संकटे येत होती. पैसा तर टिकतच नवता. पैशामुळे आधीच अशांत कुटुंब अधिक अडचणीमध्ये येत होते. घरामधे असंख्य कटकटी सुरू होत्या.
गेल्या महिन्यात मी एका सेवेकरी ताईंना फोन केला. ताई सुरवातीला अनोळखी होत्या पण स्वामींच्या एका पोस्टखाली आमची ओळख झाली आणि मैत्री झाली.
मी जेव्हा माहेरी होती तेव्हा माझी आई स्वामींची खूप सेवा करत असे. आई सोबत मी देखील स्वामींची सेवा करत असे पण लग्न झाल्यापासून मला स्वामी महाराजांची सेवा तशी करता आली नाही.
सासरी तसे देवाचे जास्त कुणी करतही नसे, एके दिवशी ताईंना मी फोन केला आणि त्यांच्याकडून मल्हारी सप्तशती पुस्तक घेतले.
ओळखीने ओळखी निघाल्या आणि एके दिवशी मी त्यांना फोन करून माझे सगळे प्रॉब्लेम्स संगितले. कधीकधी कुणी ऐकून घेतले तरी खूप बरे वाटते, ताईंनी माझे सगळे ऐकून घेतले.
ताईंनी मला संगितले की, स्वामी महाराज दिन दुबळ्यासाठीच होते. आपण स्वामींचे सेवेकरी स्वामींचे काम जर आपण केले तर स्वामी नक्की आपल्याला मदत करतील.
ज्या कुणाची होईल तितकी मदत करा, सगळे काही ठीक होईल. मी रोज माझ्या परीने अन्नदान सुरू केले, स्वयंपाक बनवताना मी फक्त एका माणसाचे जेवण जास्त बनवायचे आणि कुणी घरच्या जवळपास भुकेलाअसेल तर त्याला ते देऊन यायचे.
मी रोज ताईंना फोन करून सांगायचे देखील. असे करताना मला एक मानसिक आनंद मिळू लागला आणि मी घरातल्या कटकटींना देखील दुर्लक्षित करायला लागले.
तुम्हाला म्हणून खरी परिस्थिती सांगते, एके दिवशी मला अॅसिडिटी झाली होती.. मी पोटशी आहे, मला दूध प्यायची इच्छा झाली होती पण जो माझा नवरा दिवसाला लाखोंचे व्यवहार करायचा त्याच्या 1 दुधाची पिशवी घेण्याइतके 25 रुपये देखील नवते.
मी महाराजांचे नाव घेऊन रात्रभर रडत होते. पैसे नसल्याने माझे पती चिडचिडे झाले होते. त्या दिवशी आमचे पुन्हा भांडण झाले आणि शेवटी माझ्या पतींचा बांध तुटला, एखाद्या लहान मुलासारखे ते माझ्यापाशी रडले.
दिवाळी पासून च आमची परिस्थिती बिकट झाली होती, दुसऱ्या दिवशी मी दुपारी थोड्या वेळ आराम करू म्हणून झोपले पण काय झोप लागली नाही, तेव्हा मी ताईंना फोन केला. ताईंनी मला धीर दिला.
त्यादिवशी माझ्या पतींनी माझ्या खात्यामध्ये 2000 रुपये टाकले. मी इतकी खुश झाले की, काय सांगू ?? दिवस खूप चनाला गेला. मी गुरुचरित्राचे पठन करत असतानाच ते आले.
ते फोनवर बोलत होते, त्यांच्या कशाच्या तरी चिटनीस पदी निवड झाली होती. महाराजांच्याच मुले त्यांना ते पद भेटले होते.रात्री आम्ही जेवण करून बसलो आणि धक्का बसल्यासारखीच एक गोष्ट घडली.
दोन कंपन्याकडून आम्हाला 20 लाख रुपये येणार होते पण कंपन्या गेली अनेक महीने चुकारपणा करत होत्या. माझ्या पतींनी तर एकदा म्हटले होते की ते पैसे बुडाले. पण रात्री त्यांनी संगितले की सगळे पैसे मिळाले आहेत.
महाराजांनी माझी परीक्षा पाहिली आणि मी चुकले नाही आदल्या दिवशी खाली असलेले आमचे घर आज फुलले होते.
एके दिवशी स्वामी मठात रुष्ट होऊन स्वामी गायब झाले. फोटो मध्ये दिसेनासे झाले. काहीतरी चुकल्याची हुरुहुर लागली.
एक माणूस त्या फोटोकडे डोळे फाडून बघत होता काहीही हालचाल न करता एकटक हात नव्हते जोडले. मला कसं तरी वाटलं.
मी फोटोकडे पाहते तर काय जप सुरू होता पण क्षणार्धात स्वामी प्रतिमा कोरी. स्वामींची लीला अगाध.
आणखीन एक वेळ घाबरून घट्ट मितलेले डोळे उघडुन पाहिले तर स्वामी प्रतिमा होती पण तो माणूस गायब.
स्वामी कसेही दर्शन देऊ शकतात पण आपल्याला उमगायला हंवं कारण मी त्या माणसाला खूप शोधल पण अजूनही नाही सापडला. हर हर शंभो नमामी शंभो
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.