नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ , हे स्वामी गुरू राया परब्रह्मा सद्गुरुराया,तुम्ही आमच्या आयुष्यात नेहमी सोबत रहा.आमचे सदैव संकटापासून रक्षण करा.तुमच्यामुळे,तुमच्यासाठी आहे हे जीवन.मी तर माझ्या प्रतीने जी सेवा,जशी सेवा जमते तशी करतो.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींना ही प्रार्थना करा की,कारण आपण अशा प्रार्थने मधूनच आपल्या स्वामीपर्यंत,आपल्या गुरू पर्यंत त्या देवा पर्यंत आपली भावना पोहोचवू शकतो आणि त्यांची कृपा प्राप्त करू शकतो.जेव्हा आपल्याला काहीतरी सांगायचे असते तेव्हा,काहीतरी मागायच असेल तर प्रार्थना करावी लागते.
“श्री स्वामी समर्थ” “जय जय स्वामी समर्थ” ही प्रार्थना कागदावर लिहून घ्या किंवा याचे पाठांतर करून घ्या आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी जिथे असाल तिथे म्हणा,जमलं तर स्वामींच्या समोर बसून प्रार्थना करा मग झोपी जा.
रोज ही प्रार्थना करा.मग बघा तुमच्या जीवनात काय आनंद येतो.रात्री ही प्रार्थना म्हणाल तर दुसऱ्या दिवशी तुमच्या जीवनात नवीन प्रेरणा,नवीन ऊर्जा,नवीन आत्मविश्वास घेवून येईल.नक्कीच स्वामींची कृपा तुमच्यावर होईल.
वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत.
आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो.
परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल.
मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय.
प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते.
वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त.
आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे.
कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही.
शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा.
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य, अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी. यामध्ये इतक सामर्थ्य आहे की प्रत्यक्ष स्वामीबळ पाठीशी उभे राहील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.