नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्म पुराणात काही गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जातात आणि त्यांचा लाभ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात बरेच बदल घडवतात. याउलट काही अशुभ गोष्टीही आपल्याबरोबर घडत असतात.
त्यामुळे आपले जीवन पूर्ण बरबाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या 5 गोष्टी लक्षात घेऊन जर त्यावर काही उपाय केल्यास, संकट काही प्रमाणात कमी करण्यासाठी मदत होते.
अशा पाच गोष्टी की, ज्यामुळे नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती मोठं संकट निर्माण होत असते. यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्टी म्हणजे , जर तुमच्या घरातील दररोजच्या वापरातील एखादी वस्तू उदा.
टेबल, खुर्ची किंवा बेड अशा वस्तू अचानक तुटल्या तर हा एक अत्यंत अशुभ संकेत असतो. यामुळे तुमच्या किंवा तुमच्या जीवलगाच्या आयुष्यात खूप मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता असते.
त्यामुळे आपण वेळीच सावध झाले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ,जर तुमच्या घरातील सोन्याचे, चांदीचे किंवा हिऱ्याचे दागिने हरवले तर हे एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वाईट गोष्टीचे संकेत मानले जातात. यामुळे तुमच्या नजीकच्या भविष्यात काहीतरी अशुभ घडण्याची शक्यता असते
पण जर हे दागिने आपल्या घरातून चोरी झाले तर तो कोणत्याही प्रकारचा संकेत नसतो. याशिवाय जर आपल्याला एखादी सजलेली किंवा साज शृंगार केलेली महिला दिसली तर, ती गोष्ट शुभ असते.
पण याउलट जर तीच नटलेली सुंदर महिला सतत,वारंवार आपल्या स्वप्नात येत असेल तर हा अशुभ संकेत आहे. त्यामुळे लवकरच एखादं संकट तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता असते.
तसेच जर आपल्या घरात उंदीर भरपूर प्रमाणात झाले असतील किंवा उंदीर किंवा मधमाशा, इतर लहान लहान कीटकांचे प्रमाण अधिक असेल तर किंवा जीव जंतू वारंवार होत असतील तर आपल्या घरातील एका सदस्यांकर मोठे आजारपण येण्याचे हे संकेत मानले जातात.
शेवटची गोष्ट म्हणजे , जर आपल्या घराजवळ एखादं वाद्य किंवा संगीत वाजत असेल किंवा ढोल एखाद्या कार्यक्रमात वाजत असल्यास त्यांच्या संगीताचा आवाज,
तुम्हाला जर एखाद्या झाडाच्या पानांच्या सळसळता आवाज सतत येत असेल किंवा तसा भास होत असेल तर नजीकच्या काळात हा खूप मोठा अपशकुन होण्याचा धोका असतो.
हे 5 संकेत जर आपल्या जीवनात किंवा घरात याची लक्षणे दिसल्यास ,लगेच यावर उपाय करा.वेळीच सावध रहा, ज्यामुळे हा धोका टळेल.
त्यामुळे संकटे यायची शक्यता कमी होते. घाबरु नका. याचा जास्त विचार करू नका. यावर एक उपाय म्हणजे तुम्ही स्वामी सेवा सुरू ठेवा.
नियती तर आपण बदलू शकत नाही पण आपल नशीब व परिणाम बदलू शकतो. यामुळे जिवनात वेगळे बदल घडू शकतात.
तसेच आपण घरातील देवपूजा, नित्य स्वामी सेवा, पारायण करावे. घरात सर्व शुभ बोलावे. तसेच काही गोष्टी टाळू शकतो त्या म्हणजे आळस तसेच रोज कापूर धूप घंटा अगरबत्ती देवपूजा करावी.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.