नाशिक जिल्ह्यातील अनोखा भावून करणारा श्रद्धा दृढ करणारा स्वामींच्या भक्तीचा अनुभव…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा दिलासादायक आणि सकारात्मक गुरुमंत्र देणारे स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले.

श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हेच नंतर स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले.

मी नृसिंह भान असून, श्रीशैलम्‌‍जवळील कर्दळी वनातून आलो आहे, असे स्वामींच्या तोंडचे उद्‌गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सूचवतात.

अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू संस्कृतीनुसार, घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले.

स्वामी समर्थांनीच तेथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले, असे सांगितले जाते.

भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अनेकांना मार्गदर्शन करणारे, ब्रह्मांनायक स्वामी समर्थ ३० एप्रिल १८७८ रोजी समाधीस्त झाले.

आजघडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून, अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींचे स्मरण करीत असतात.

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले.

राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन, असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे.

शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते.

स्वामींचे भक्त अनेक तरिने भक्ती करत असतात. प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत असतात. यामुळे स्वामींच्या भक्तीची धारणा आणखीनच दृढ होते.

अनेक स्वामी भक्त त्यांचे सुंदर सुंदर अनुभव सांगत असतात. असाच एक अनुभव या ताईंना आला. या ताई नाशिक जिल्ह्यातून आहेत.

त्या रोज स्वामींची सेवा त्यांच्या कुटुंबियांच्या समवेत करतात. स्वयंपाक करताना देखील नाम जप सुरूच ठेवतात. त्या ताई स्वामी केंद्रात रोज सेवा म्हणून चपाती देत असत.

असे त्या रोज न चुकता करीत. स्वामी भक्तीमध्ये हे कुटुंब अगदी निर्भय होते. त्यादिवशी ताई चपाती करत होत्या. ताईंना एक सवय होती त्या स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ म्हणत असत.

आणि प्रत्येक चपाती घडी घालून ठेवत असत. आजही चपाती करत असताना चमत्कारिक अनुभव आल्या. थोड्या चपाती झाल्यावर एक चपाती खाली काढून ठेवली असता

त्यावर स्वामींची प्रतिमा दिसली. तुम्हाला देखील दिसली असेल तर कॉमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्यावेळी ताईंना अक्षरशः खूप आनंद झाला.

स्वामींची भक्तींकिती निर्मळ असते व स्वामी त्यांच्या भक्तांना असे सुखद अनुभव देत असतात. ताईंनी ही चपाती त्यांच्या घरी सर्वांना,

शेजारी लोकांना दाखवली व सर्वांना आनंद झाला. यामुळे स्वामींची भक्ती दृढ झाली.

तुम्हाला देखील असे छोटे मोठे अनुभव आले असतील तर नक्की सांगा. स्वामी तुमच्या सर्व शुभ इच्छा पूर्ण करू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!