स्वामींच्या या 3 सेवा रोज केल्यास भरभरून प्रगती यश मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्याला अनेक अडचणी येत असतात, दु:ख, भिती, चिंता,काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटुन असते, काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. पहिली सेवा अशावेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी.

श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो.दररोज घरात श्री सूक्त पठन केले असता, त्या घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही.

लाल रंगाच्या रिबिनमधे तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश द्वारावर बांधल्यास घरात सुखशांति व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तूळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो.

दुसरी सेवा नोकरी, व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरूचरीत्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याचवेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तीसरा व श्री गुरूचरीत्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा.

ज्या घरात एक तरी भक्तीवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटूंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटूंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते, शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमीत बोला, किंवा रेकॉर्डींग सुरू ठेवा.

स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो. उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा करणीभूत होतो.

विचार हा सुविचार होण्याला ध्यान-चिंतनाची आवश्यकता फार असते, म्हणून ध्यानधारणा मननचिंतन याला फारच महत्त्व आहे.अनेकवेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही.

अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. तिसरी सेवा यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील १२ व्या अध्यायातील पहिल्या १६ ओळी वाचाव्या. शांत झोप लागेल.आपण बहुतेक वेळा स्वामींकडून बंगला, गाडी ,पैसा अशा मोठ्या गोष्टी आशीर्वाद म्हणून मागत असतो.

पण स्वामी या गोष्टी आपल्याला कधीच देणार नाहीत, पण या सर्व गोष्टी मिळवण्यास आपल्याला शक्ती देऊ शकतात. त्यामुळे प्रार्थनेमध्ये काही विशेष गोष्टी मागितल्या पाहिजेत.स्वामी सांगतात की तुम्ही सत्कर्म करत रहा, फळाची चिंता करू नका. तसेच तुम्ही स्वतःच्या आयुष्यात काय सुरू आहे याचं परीक्षण करा, इतरांना त्रास देण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका.

असे सांगितले आहे की ,जर तुम्हाला श्री स्वामींकडून काही मागायचे असेल ते काम करण्यासाठी बळ तसेच इच्छाशक्ती मागितली पाहिजे. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना नियमितपणे करावी.

त्यांना नमस्कार करून तसेच शक्य असल्यास आपण स्वामींचे केंद्रात गेल पाहिजे किंवा घरीच स्वामींचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसुन,पूर्ण श्रद्धेने नमस्कार करावा. मग स्वामीं समर्थ महाराजांकडून आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या परिवाराला मिळणारे सुख ,तसेच आनंद ,समाधान मागावे.

समाधान म्हणजे स्वामींनी आपल्याला आतापर्यंत जे काही भरभरून दिले आहे त्यामध्ये समाधान मानावे. तसेच घरी आल्यावर घरात शांतता असायला हवा ,

घरातील परिवाराचे किंवा लोकांच्या चेहर्‍यावर आनंद असायला हवा याशिवाय आपल्या सगळ्यांच आरोग्य चांगले राहावे या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण स्वामी समर्थ महाराजांकडे मागू शकता.

यामध्ये सुख ,समृद्धी मागू शकतो. आपण स्वामींची दररोज पूजा पूर्ण श्रद्धेने केल्यास स्वामी या सर्व गोष्टी आशीर्वाद म्हणून देतात.

फक्त आपण विश्वासाने , मनोभावे प्रत्येक गोष्ट मागायला हवी. याउलट आपण पैसा ,गाडी, बंगला हे मागू नये कारण स्वामी हे कधीच तुम्हाला देणार नाहीत.

कारण ते नाशवंत, क्षणिक सुख देणारे दुःख आहे. शक्य तितके नाम जप करा..जमत असल्यास स्वामी केंद्रात आरतीला जावे. मन प्रसन्न होईल. केंद्रात सर्व संकल्प सांगितले जातात. आपल्या अडचणी दूर होण्यासाठी सेवेकरी नेहमीच तत्पर असतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!