नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे दोन संकेत स्वामींचे आहेत. स्वामी आपल्याला देतात हे संकेत.
स्वामींचा आशीर्वाद तुमच्या वर आहे की नाही संकेतानुसार तुम्ही ओळखू शकता. तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी स्वामींचे भक्त आहेत
आणि तुम्ही मनापासून स्वामींवर विश्वास ठेवत असाल, स्वामींची सेवा करत आहेत तर तुम्हालाही हे दोन संकेत तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात मिळत असतील
तर उत्तमच. आपल्याला माहीत नसत की स्वामी आपल्याला कोणते संकेत देतात आणि आपण कसे ओळखावे? की स्वामी आपल्या सेवेवर प्रसन्न आहेत की नाहीत
किंवा स्वामींची कृपा आपल्यावर झालेली आहे की नाही ? हे संकेत काही असे आहेत, आपण स्वामींची सेवा करतो, नामजप करतो
पारायण करतो किंवा कोणतीही सेवा आपण स्वामींची करतो जर विश्वासाने श्रद्धेने आपण करत असू,
जेंव्हा आपण देवघरासमोर बसू स्वामी च्या समोर बसू तेव्हा आपल्याला असं वाटत असेल की मन आपले प्रसन्न आहे.
स्वामींची सेवा करून जर तुम्हाला प्रसन्न वाटत असेल आणि एक वेगळाच सुगंध तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरात दरवळत असेल
तर समजा की स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहे. स्वामी हे तुमच्या आजूबाजूला तुमच्या पाठीशी आहेत असे संकेत म्हणजे आपण रात्री झोपतो तेंव्हा स्वप्नात स्वामी येतात
स्वामी झोपेत स्वप्नात दर्शन देऊन जातात आणि ज्यांना दर्शन देतात त्यांनी समजावे की ते खूप जास्त नशीबवान आहेत. सेवेच फळ म्हणून स्वामींनी त्यांना दर्शन दिले आहेत.
स्वप्नातच आपल्या जर स्वामी आले आणि दर्शन दिले हे संकेत खूप मोठे आहेत.
ते स्वप्नात येऊन स्वामींनी दर्शन दिले ते जर तुमच्या सोबत होत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. समजा की स्वामींची कृपा तुमच्यावर कायमस्वरूपी आहे..
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.