स्वामी महाराज सांगतात रोज बोला हा मंत्र, सर्व आर्थिक समस्या संपतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,आपलं घर, घरातील माणसं नेहमी सुखा समाधानात राहावीत असं प्रत्येकाला वाटत. आपलं घर नेहमी आनंदी राहावं, नकारात्मक ऊर्जा निघून जावी यासाठी हा दैवी, शास्त्रातील उपाय परंपरागत चालत आला आहे.

घरातील ऊर्जा सदैव सकारात्मक राहण्यासाठी आपण देवाची भक्ती केली पाहिजे, तेव्हा आपलं जीवन सफल होईल. आपण रोज सकाळी संध्याकाळ देवघरात दिवा लावतो. दिवा म्हणजे चैतन्य, प्रकाश, नवीन आशा व दिवा म्हणजे आपल्या जीवनातील सुख व समाधान.

दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते तसेच घर हे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनते. देवघरात दिवा लावताना एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे .

कारण या मंत्राच्या सामर्थ्याने तुमचे शत्रु कमी करण्यासाठी मदत होईल. आपण दररोज देवपूजा करतो. देवपूजेत दिव्याला अत्यंत महत्व आहे.

दिवा लावल्याने घरात शुभ आणि मंगल गोष्टी घडतात . म्हणून कोणत्याही मंगल कार्याला दिवा सर्वप्रथम लावला जातो. या उपायासाठी हा दिवा लावताना काही नियमांचे पालन नक्की करा.

हा दिवा लावताना तो जमीनीवर लावायचा नाही त्याच्या खाली काहीतरी म्हणजे फुले किंवा झाडाचे पान , एखादे छोटे पात्र यावरती दिवा लावायला हवा. दिवा लावण्यासाठी शक्यतो मोहरीचे तेल वापरा.

याने तुमची शत्रुपिडा कमी होण्यास मदत होते. जर मोहरीचे तेल नसेल तर चमेलीचे तेल चालते. सर्वात महत्वाचे म्हणजे दिव्यात आपण जी वाट घालतो ती रुई म्हणजेच कापसाची असावी.

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |

हा दैवी व चमत्कारिक मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे .सोबतच हे 3 मंत्र बोला. ओम कुलदेवताय नमः, ओम पितृ देवाय नमः, ओम वास्तू देवताय नमः. हे 3 मंत्र खूप लाभकारी आहेत.

हे सर्व मंत्र सोपे आहेत. जर तुम्ही रोज बोललं तर थोड्याच दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. यासाठी आपली मती शांत ठेवा, आपलं घर नीट ठेवा, माता लक्ष्मीचे आगमन सायंकाळी होत असते त्यावेळी झाडू मारू नका,

वाद, कलह, भांडण करू नये. त्यासाठी सतत ईश्वराचे चिंतन करावे. हा मंत्र आपल्याला आपले घरचे सांगतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु रोज हा मंत्र म्हणल्यास तुम्हाला त्याचे खूप चांगले परिणाम भेटतील.

सकाळी व सायंकाळी 2 वेळेस घरी दिवा लावावा व इष्ट देवतेचे स्मरण करावे. देवघरातील दिव्यात खूप दैवी शक्ती असते,

यामध्ये असणारी ऊर्जा आपल्याला सकारात्मक बनवते. तसेच घरातील वातावरण सदैव प्रसन्न राहते. आपल्या जीवनातील सर्व समस्या या मंत्राने पूर्ण होतात. यामुळे आपली शक्ती वाढते, सामर्थ्य वाढते व परिणामी आपलं मन शांत राहते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!