नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू देत. स्वामी नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की जेव्हा काही लोक आपल्याशी वाईट वागतात तेव्हा आपण काय करायचं? जेव्हा आपल्या सोबत एखादी व्यक्ती वाईट वागते, आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे परमेश्वराचे शक्ती.
परमेश्वराचा प्रेम आणि माझ्या खुप सार्या शुभेच्छा तुझ्या सोबत नेहमी असं बोलायचं आहे. वाद करू द्यायचं नाही आणि जर बिघडलं तर पुन्हा रिपिट करायचे आहे. पण आपल्या मनाला रडू द्यायचं नाही. आपल्या मनात जराही वाईट विचार आणू द्यायचे नाही.
आपल्या मनाला जराही वाईट ठिकाणी जाऊ द्यायचं नाही आणि जर आपलं मन त्या ठिकाणी गेलं असलं तरी तेथून पुन्हा आपल्याला चांगल्या ठिकाणी आपल्या मनाला आणायचा आहे. हे करणं सोपं नाहीये पण जेव्हा जेव्हा आपलं मन दुसऱ्या ठिकाणी जाईल तेव्हा सारखा सारखा आपण चांगले विचार करत राहायचे.
त्या भरकटलेल्या मनाला व्यवस्थित ठिकाणी आणून ठेवायचं. अनेकदा अडचणी येतील पण तिसऱ्यांदा आपलं मन चांगलाच विचार करत राहील. आपल्या आयुष्यात वाईट विचार करण्याचे लिमिट नाहीये. खरंय, नाहीच आहे… कारण आपल्या मनात सर्वात पहिले वाईट विचार येतात तसे वाईट विचार करण्याची लिमिट नाहीये.
अगदी तसे चांगले विचार करण्याची हिंमत नाहीये हे विसरून आपण खूप काही चांगले विचार करू शकतो. काहीजण तुमचा वाईट विचार करतील देखील पण आपण मात्र चांगला विचार करत राहायचा आहे.
कारण आपले कर्म आपले भाग्य लिहीत असतात आणि त्यांचे कर्म त्यांचा भाग्य लिहीत आहे. आपण त्यांनी केलेले कर्म पाहून आपलं भाग्य बिघडू द्यायचं नाही. भक्तानो आपल्या शरीरातील बॅटरीला हंड्रेड पर्सेंट चार्ज ठेवायचा आहे. काही वर्षांपूर्वी काही लोकांना मेडिटेशन करायला ध्यान करायला तपश्चर्या करायला उपासना करायला खूप आवडायचं म्हणून ते करत होते पण आता आपण ज्या परिस्थितीमधून जात आहोत.
त्या परिस्थितीमध्ये मेडिटेशन करन नामस्मरण करणं हे ऑप्शनल होऊ शकत नाही. आता ध्यान करणं नामस्मरण करणं ही आपल्या साठी आवश्यक आहे. नाहीतर जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील जेवढे काही संकट असते मग डिप्रेशन असुद्यात शुगर असू द्या किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतात खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात आणि मानवाच्या आयुष्यातील सर्व अडचणी आपल्या शरीरातील बॅटरी लो करतात.
अचानक कोणी ना कोणी डिप्रेशनमध्ये जातात. अचानक कोणाला ना कोणाला रडायला येतं पण टेन्शन मध्ये आपण नाराज होऊन बसतो कारण आपल्या शरीरातील बॅटरी हळूहळू उतरत जाते आणि या सर्वांवर एकच उपाय आपल्या आयुष्यात मेडिटेशन ध्यान करणे.
नामस्मरण करणं हे कंपल्सरी झालं पाहिजे. आपल्या आयुष्यात ही गोष्ट आपण ही गोष्ट केली तर याची पूर्ण शक्ती आपल्या परिवाराला मिळणार आहे. तुमच्या मुलांना मिळणार आहे. भक्तओ तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेडिटेशन ध्यान करणे यामुळे नक्की होतं तरी काय?
तर मेडिटेशन काय करतं की आपल्यातील आत्म्याला त्या परमात्म्याशी जोडून देतं आणि जेव्हा आपण त्या परमेश्वराशी जोडले जाऊ आपल्या शरीरातील जी लो झालेली बॅटरी असते ती चार्ज होऊ लागते. आपली आत्मवृत्त बॅटरी कायम सदैव चार्ज असली पाहिजे. भक्तांनो लावा तुमची आत्मवृत्त बॅटरी चार्ज करण्यासाठी नक्की पहा चमत्कार.
यानंतरचे गोष्ट म्हणजे आपण ज्या गोष्टींची जास्त आठवण काढत असतो त्याच गोष्टी आपण जास्त कनेक्ट होत असतो आणि त्या गोष्टींचा व्हायब्रेशन आपल्यावर यायला सुरुवात होते म्हणून तर आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की सकाळी उठल्या उठल्या पहिले त्या परमेश्वराची आठवण काढा.
त्यामुळे काय होतं की आपली आत्मरुपी ची बॅटरी असते ते फुल चार्ज होते. आपण जर वाईट लोकांची आठवण काढत बसलो तेव्हा आपल्या आयुष्याचे संकट आहे त्यांना पण आठवत बसलो तर त्या गोष्टींचे वाईट व्हायब्रेशन्स आपल्यावर यायला सुरुवात होते आणि आपली बॅट हे पूर्णपणे लो होऊन जाते.
त्यामुळे उठल्याउठल्या आपल्या परमेश्वराची आठवण काढा. त्यामुळे आपली बॅटरी कायमच चार्ज राहील असे विचार करा. त्यानंतर रोज सकाळी उठल्यावर आपल्याला एक छोटासा संकल्प करायचा आहे. भक्तांनो आपल्यातले नव्वद टक्के लोक अशी असते की सकाळी उठल्या उठल्या ते पहिले आपला फोन बघतात सगळेच नाही पण खूप जण सकाळी लवकर उठला उठला फोन बघतात.
आपण एक महिन्यासाठी थोडा बदल करायचा आहे. कारण जर आपण सकाळी उठल्या उठल्या सर्वात पहिले फोन बघितला तर आपले विचार आपल्या मनात आपली बुद्धी त्या दिशेने चालत नाही पूर्वीच्या काळी फोन वगैरे काहीच नव्हतं तेव्हा लोक सर्वात पहिले उठल्याउठल्या त्या परमेश्वराची आठवण काढायचे. सर्व काही बदल झाला आहे. आपली ही सवय आपल्याला जराशी बंद करायची आहे.
सकाळी उठल्यावर किमान अर्धा तास तरी आपल्याला फोन बघायचा नाही. फक्त एक महिना करा. आपल्या फोन मध्ये अर्जंट असं काहीच नाहीये आणि जर काही अर्जंट असेल तर ती व्यक्ती आपल्याला फोन करेनच. तुमच्या फोनमधील सोशल मीडिया गुड मॉर्निंग आणि जे काही असेल ते जर सकाळी आपण उठल्याउठल्या पाहिलं तर मग त्या आपला मनात वाहत जाईल.
आपल्यातील आत्मरुपी शक्तीचे बॅटरी ते पूर्णपणे लो जाईल. खरं तर बघतांना आपल्याला सर्वात पहिले गुड मॉर्निंग त्या परमेश्वराला केलं पाहिजे कारण त्या परमेश्वराने आपल्याला जन्माला घातलं आणि त्यामुळे आपण सर्वकाही सुरळीत करत आहोत.
सर्वांचा परमात्मा एकच आहे. परमात्मा शक्ती आहे. परमात्मा परमात्मा प्रकाश आहे. परमात्मा शांतीसागर आहे. परमात्मा ज्ञान सागर देखील आहे. भक्तांनो रोजच्या रोज एक चित्र आपल्याला बनवायचा आहे.
परमेश्वराची शक्ती माझ्यावर येत आहे आणि परमेश्वराच्या शक्तीचा कवच माझ्या चारी बाजूंनी आहे. मी परमेश्वराच्या शक्तीच्या कवचामधून रोज चालत आहे. जेव्हा आपण परमेश्वराच्या शक्तीचा कवच आपल्या सोबत बनवू तेव्हा वाईट शक्तींचा वाईट विचारांचा प्रभाव आपल्यावर येणार नाही.
कुणी तुमच्या बद्दल वाईट विचार जरी केला तरी ते वाईट विचार तुमच्या शरीरामध्ये येऊ शकणार नाही. कारण तुम्ही परमेश्वराच्या शक्तीच्या कवचात आहात. भक्तांनो आज काल आपल्या आयुष्यात थोडं तरी काही झालं तर आपण लगेच बोलतो की काय माहिती आपल्याला कोणाची तरी नजर लागली.
आपल्याला अशी नजर लागेल कशी नजर तर तेव्हा लागेल तेव्हा आपण आपले विचार त्यांच्या प्रकारे बनवतो. त्यामुळे पूर्ण दिवस आपल्याला असे शब्द बोलायचे नाहीये की आपल्याला कोणाची तरी नजर लागेल. सतत फक्त आणि फक्त कर्म, कर्तव्य व धर्म सांभाळा व त्यासाठी ईश्वराची प्रामाणिकपणे भक्ती करा.
सकारात्मक विचार करा. दिवसाचं प्लॅनिंग करा. वेळ वाटून घ्या. तळहात पाहून दर्शन घ्या व मंत्र तीन वेळा बोला. स्नान करून पूजाविधी करा. सूर्याला अर्घ्य द्या. सर्व गोष्टी छान होतील..घरच्याना प्रेमाने बोला.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.