रोज घरात स्वामींचा हा तारक मंत्र बोला, घरात कोणतेही संकट येणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, योगीराज, गुरुदेव यांची सेवा करताना मन खूप समाधान राहत, प्रसन्न होतं. सेवा करताना तारक मंत्र कोणता आहे ज्याचा नित्य जप आपण केला पाहिजे, तारक मंत्र कसा जपावा, त्याचे आपल्या आयुष्यात काय महत्व आहे याची सर्व माहिती असणे गरजेचे आहे, कारण सेवा करत असताना चुकीचं काही व्हायला नको त्यासाठी आपण हे जाणून घेतले पाहिजे.

मंत्र जप काय आहे, त्याचे महत्व, त्याच पालन कसे करावे याची माहिती स्वामी भक्तांना असायलाच पाहिजे. स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र नावातच त्याचा अर्थ दडला आहे. असा मंत्र जो आपल्याला तरुण नेतो.

आपलं संरक्षण करतो. जो संकटात आहे, त्रासाने ग्रासलेला आहे, स्वामी त्याची दया करतात, य मंत्राचा जप तुमची मानसिकता बदलतो, तुम्हाला संकटाशी दोन हात करण्यासाठी बळ देतो.

या मंत्राची महती अनेकांनी अनुभवली आहे. अनेकजनांनी याचा चमत्कार त्यांच्या आयुष्यात पाहिलेला आहे. कधी अस्वस्थ वाटलं, उदास वाटलं तर याचा जप करा आणि बघा तुम्ही किती फ्रेश होता ते.

या तारक मंत्राचा एक एक शब्द अर्थपूर्ण आहे. मंत्राच्या पहिल्या ओळीतच स्वामींनी सांगितलंय की हे मना तू निःशंक हो, स्वामी नामाची, स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे.

स्वामी स्वतः प्रारब्ध घडवतात. स्वामी आहेत म्हणून आपण आहोत. आपल्या बाळाला काय झाल्यावर जशी आई धावून येते तसे आपले स्वामी भक्त संकटात असल्यावर त्यांच्या मदतीला धावून येतात. एवढी कनवाळू, दयाळू स्वामी माऊली असताना घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे.

“खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविन तू स्वामी भक्त “, माऊलीवर असणारे प्रेम हे व्यक्त करावे तसेच गुरू माऊलीवर असणारा विश्वास, श्रद्धा, भक्ती, प्रेम पवित्र अंतकरणाने व्यक्त करावे. ते तारक मंत्राच्या रूपाने त्याचा जप करून व्यक्त करावे.

“आठव कितीदा दिली त्यानेच साथ , नको डगमगू स्वामी देईल हात ” स्वामी पडल्या झडलेल्या प्रामाणिक भक्तांना नेहमीच हात आणि साथ दोन्ही देतात. हा तारक मंत्र काहीसा असा आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. स्वामी आपल्याला या भवसागरातून तरून नेण्यास आशीर्वाद देतात. स्वामींची जर कृपा असेल तर भिकारी सुद्धा श्रीमंत होतो, भक्ती करताना त्यामध्ये सातत्य हवं, तसेच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा, स्वामींच्या चरणी सर्व भावना अर्पण करा.

पण जर तुम्ही स्वामींची जर आपल्याला कृपा लाभली तर आपलं जीवन आनंदी बनेल. रोजच्या जीवनातील कोणत्याही वेळी सकाळी असो, सायंकाळी असो किंवा रात्री झोपण्यापूर्वी असो तुम्ही स्वामींचा हा मंत्र जप करा.

या मंत्रात खूप मोठे सामर्थ्य आहे, आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. भक्ती करण्यासाठी जात,धर्म यांचे बंधन नसते, ती एक पवित्र श्रद्धा व भावना असते जी शुद्ध अंतःकरणात असते.

तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला हे माहीत असायलाच हवे. तुम्हाला किंवा तुमच्या घरातील, मित्र परिवारातील सदस्याला जर स्वतःच्या जीवनात भरपूर यश मिळवायचे,समाधानी वृत्तीने समाजात मदत करायची असेल तर हा स्वामींचा उपाय तुम्ही नक्की करा.

स्वामींचे जर तुम्ही उपदेश वाचले व त्याचा उपयोग रोजच्या जीवनात केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमचं जीवन सरल होईल, समस्या सुटतील व सुख, समाधान तुमच्या आयुष्यात येईल. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती.

श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.

निःशंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे , अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।। जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविणा काळ ना नेई त्याला परलोकही ना भिती तयाला ।।२।।

उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।। खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।। विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात , हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

जगातील कोणतीही मोठी गोष्ट असुद्या, कितीही , कितीही अशक्य वाटणारं काम असुदे तुम्ही ते करू शकता कारण तुमच्या मागे स्वामींचा आशीर्वाद असतो त्यामुळे अशक्य ते शक्य करतील स्वामी असे स्वामी समर्थ महाराजांना संबोधले आहे.

या मंत्र जपाने तुमचे आयुष्य इतके चांगले होईल की सर्वजण तुम्हाला विचारतील की तू असे काय करतो की अडचणींवर मात करू शकतो. विश्वाचा स्वामी, मालक तुमच्या पाठीशी असेल तर घाबरन्याचे कारण नाही.

हा मंत्र जप करताना एका वाटीत पाणी घेऊन एक अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवावी, असे केल्याने त्या मंत्राचे सामर्थ्य त्या पाण्यात व राखेत सामावते व तेच मंत्र म्हणून झाल्यावर तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी ग्रहण करावे.

स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या पाठीशी उभे राहतात पण स्वामींना पाहण्यासाठी तशी दृष्टी सुद्धा आपल्याला हवी ! || श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ ||

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!