11 गुरुवार हे व्रत केलं तर संसार सुखाचा होतो... - Viral Marathi

11 गुरुवार हे व्रत केलं तर संसार सुखाचा होतो…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर पत्रिकेत गुरु ग्रह (बृहस्पती)शी निगडित कुठलेही दोष असतील तर त्याच्या शांतीसाठी गुरुवारी विशेष पूजा केली जाते. बृहस्पती देवांचे पण गुरु आहेत. गुरु वैवाहिक जीवन व भाग्याचा कारक ग्रह आहे. येथे आम्ही गुरु ग्रहाच्या पूजेचे 5 उपाय, ज्यामुळे या ग्रहाचे दोष दूर करू शकता…

गुरुवारी गुरु ग्रहाच्या निमित्ताने व्रत ठेवावे. ज्यात पिवळे वस्त्र परिधान करावे व बिन मिठाचे भोजन ग्रहण करावे. जेवणात पिवळ्या रंगांचे खाद्य पदार्थ जसे बेसनाचे लाडू, आंबे, केळे इत्यादी सामील करावे.

बृहस्पतीची प्रतिमा किंवा फोटोला पिवळ्या वस्त्रावर विराजित करावे. यानंतर पंचोपचारद्वारे पूजा करावी. पूजेत केशरी चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फूल व प्रसादासाठी पिवळे पक्वान्न किंवा फळ अर्पित करावे. आरती करावी.

गुरु मंत्राच जप करावा – मंत्र- ॐ बृं बृहस्पते नम:। मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असायला हवी. गुरुशी निगडित पिवळ्या वस्तूंचे दान करावे. पिवळी वस्तू जसे सोनं, हळद, चण्याची डाळ, आंबा (फळ) इत्यादी.

महादेवाला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पित करावा. हे उपाय केल्याने धन, संपत्ती, विवाह आणि भाग्य संबंधी सर्व अडचणी नक्कीच दूर होतात.

भारतीय संस्कृतीत आठवड्यातील प्रत्येक दिवस हा एखाद्या देवतेसाठी आणि ग्रहासाठी समर्पित करण्यात आला आहे. यानुसार, गुरुवार हा दिवस सृष्टीचे पालनहार मानल्या गेलेल्या श्रीविष्णूंसाठी आणि गुरु ग्रहासाठी समर्पित करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे या दिवशी लक्ष्मी देवीची उपासना, आराधना, नामस्मरण करणे लाभदायी मानले गेले आहे. तसेच गुरुवारी केलेल्या श्रीविष्णूंच्या पूजनामुळे केवळ विष्णू देव नाही, तर लक्ष्मी देवीचेही आशीर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता आहे.

याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीतील गुरु ग्रह कमकुवत असेल, तर गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांनी तो मजबूत व सक्षम करता येऊ शकतो, असे सांगितले जाते.

कुंडलीतील गुरु दोष निवारण्यासाठी गुरुवारी गुरुच्या शांतीसाठी विशेष पूजा केली जाते, अशी माहिती ज्योतिषी प्रमोद पांडेय यांनी दिली. गुरु वैवाहिक जीवन, धन, समृद्धी यांचा कारक मानला गेला आहे.

गुरुवारी करण्यात आलेल्या काही विशेष उपायांमुळे केवळ कुंडलीतील गुरु बळकट होत नाही, तर श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीचे आशीर्वादही प्राप्त होतात, असे सांगितले जाते.

गुरुवारी गुरु ग्रहाच्या नावाने श्रद्धा आणि निष्ठा ठेऊन व्रत करावे. या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाचा समावेश असलेली वस्त्रे परिधान करावीत. आहारातही पिवळ्या रंगाचे पदार्थ समाविष्ट करावेत.

जसे. बेसनाचे लाडू, आंबा, केळे वगैरे पदार्थांचा प्रामुख्याने समावेश करावा. सकाळी उठल्यावर नित्यकर्मे उरकावीत. गुरुची मूर्ती किंवा तसबीर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर स्थापन करावी. यानंतर षोडशोपचार पूजा करावी.

पूजा साहित्यात केशरी चंदन, पिवळ्या अक्षता, पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाचा समावेश असलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावेत. यानंतर आरती करावी. मनापासून नमस्कार करून पदार्थाचे वाटप आणि सेवन करावे.

पूजा झाल्यानंतर ‘ॐ बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा. मात्र, कमीत कमी १०८ वेळा तरी या मंत्राचे पठण करावे. याशिवाय गुरुवारी पिवळ्या वस्तू, वस्त्र यांचे दान करावे.

सोने, हळ, बेसन, आंबा यांसारख्या वस्तू यथाशक्ती दान कराव्यात. तसेच गुरुवारी महादेव शिवशंकराला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. असे काही उपाय केल्यास धन, धान्य, समृद्धी, विवाह यासंदर्भातील समस्या बहुतांशी कमी होण्यास मदत होते, असे सांगितले जाते.

मात्र, असे उपाय केवळ एकाच दिवशी न करता शक्य असल्यास नियमितपणे किंवा प्रत्येक गुरुवारी करावेत, असा सल्ला दिला जातो.

कुंडलीतील गुरु ग्रह बळकट करायचा असेल, तर नियमितपणे गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. आपले आचरण शुद्ध ठेवावे. खोटे बोलू नये. वर्तन सात्विक ठेवावे. आई-वडील तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सन्मान राखावा.

गायत्री मंत्राला सर्व मंत्रांचा गुरु मंत्र मानला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गुरु नसल्यास थेट सूर्याला गुरु मानून, ‘ऊं भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्यः धीमहि धियो यो नः प्रचोदयात्’ या गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

असे उपाय केल्यास कुंडलीतील गुरु दोष बऱ्याच अंशी कमी होतो आणि त्याता प्रभावही नगण्य राहतो, असे सांगितले जाते.गुरुवारी केलेल्या लक्ष्मी-नारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते.

आपल्या कुटुंबात नियमितपणे सत्यनारायणाची पूजा केली जात असल्यास गुरुवारी येणारी शुभ तिथी आणि मुहूर्ताची निवड करावी. गुरुवारी केलेल्या सत्यनारायण पूजेचा विशेष लाभ प्राप्त होतात, असे सांगितले जाते.

गुरुवारी लक्ष्मी देवी आणि श्रीहरि विष्णू यांच्या एकत्र पूजनाने वैवाहिक जीवन सुखमय होते. घरात समृद्धी, धन, धान्य, ऐश्वर्य यांची कमतरता राहत नाही, असे सांगितले जाते.

गुरुवारी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व प्राप्त होते. सकाळी आंघोळीच्या पाण्यात एक चिमुटभर हळद घालावी. यामुळे आरोग्याच्या विविध फायद्यांसह ग्रहांची अनुकूलता प्राप्त होते, असे सांगितले जाते.

तसेच स्नानादी कार्ये उरकल्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून श्रीविष्णूंचे पूजन करणे आणि पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणे अत्यंत लाभदायक ठरते, असे सांगितले जाते.

याशिवाय गुरुवारी सोने, चांदी, नवीन वस्त्रे यांची खरेदी करणे फलदायी मानले जाते. 11 गुरुवार दत्त मंदिरात एक नारळ ठेवत चला. तुम्हाला नक्की लाभ होईल.

गुरुवारी औदुंबराच्या झाडाखाली कधीही जा व तिथे एक दिवा प्रज्वलित करा आणि 5 फेऱ्या काढून मनापासून प्रार्थना करा. नक्की उत्तम जोडीदार लवकरात लवकर मिळणार. स्वामींचा गुरूचरित्र अध्याय मोठ्यातली मोठी अडचण दूर करतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!