नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली.
अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत.
श्री स्वामी समर्थ, स्वामींचे भक्त असाल, स्वामींचे सेवेकरी असाल, तर तुम्हाला माहीतच असेल कि, स्वामींच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये स्वामींना रोज नैवेद्य दाखवायचा असतो. मग तो नैवेद्य सकाळचा असेल किंवा दुपारचा असेल किंवा संध्याकाळी असेल.
बहुतेकदा दोन वेळा नैवेद्य आपण दाखवत असतो, पण नवीन सेवेकऱ्यांना याबद्दल काहीच माहिती नसते की, स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो.
तर तुम्ही नवे सेवेकरी असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असू शकतो. आम्ही गुरूवारच्या दिवशी दाखवला जाणारा स्वामींच्या नेवेद्य सांगणार आहे.
विशेष नेवेद्य जर तुम्ही रोज स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तरी तुम्ही गुरुवारी हा नैवेद्य दाखवू शकतात आणि जर तुम्ही स्वामींना ज्या देवघरात नैवेद्य ठेवतच नसाल,
तर तुम्ही फक्त गुरुवारी तरी नैवेद्य नक्की ठेवा. मग तो सकाळी असेल किंवा दुपारी असेल किंवा संध्याकाळी असेल. फक्त गुरुवारी ठेवा.जर स्वामींचे सेवेकरी असाल रोज सेवा करत असाल तर रोज नैवेद्य ठेवायची सवय लावा.
कारण हा नैवेद्य आपणच नंतर खातो. फक्त तो स्वामींना दाखवायचा असतो. तुम्हाला माहीत असेल की, गुरुवारच्या या दिवशी विशेष सेवा केली जाते, या सोबत विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि हा नैवेद्य गोड असतो.
सर्व पदार्थ गोड किंवा पुरणपोळी खीर किंवा शिरा आणि पुरी, खीर आणि पुरी यापैकी तुम्हाला जे जमेल ते तुम्ही गुरुवारी करायचं आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे .
आणि जर तुम्ही परिस्थितीनुसार किंवा काही समस्यांमुळे अडचणीमुळे काहीच करू शकत नसाल, तर तुम्ही फक्त एक साधी चपाती, एका वाटीत दूध त्यामध्ये चिमूटभर साखर हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे.
फक्त लक्षात ठेवायचं की तुम्हाला काही ना काही गुरूवारच्या दिवशी गोड दाखवायचा आहे. मग ते सकाळी दाखवा, दुपारी दाखवा, संध्याकाळी दाखवा किंवा काहीतरी गोड दाखवायचा आहे.
तुम्ही रव्याचा शिरा करू शकतात तरी काही हरकत नाहीये. स्वामी भक्ताने प्रेमाने विश्वासाने केलेलं सगळं काही ग्रहण करतात.
फक्त त्यामध्ये कोणतीही जबरदस्ती नाही, फक्त आपुलकीने स्वामींसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे या इच्छेने तुम्हाला नैवेद्य दर गुरुवारी करायचा आहे.
अजून एक स्वामी सेवा करत रहा. किचन मध्ये असो, काही काम करत असो स्वामींचा वार म्हणजे गुरुवार. गुरू दत्तांचा वार म्हणजे गुरुवार.
अशक्यही शक्य करतील स्वामी, या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात.त्यामुळे आपल्याला स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळण्यास मदत होईल.
यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थाष्टक मंत्राचा जप करायचा आहे.
याशिवाय आपल्या सुख-समृद्धीसाठी रोज 2 मिनिट हा मंत्र वाचा किंवा ऐका ,यामुळे श्री स्वामी समर्थ अष्टक मंत्र स्वामी कृपेने इच्छा होईल पूर्ण होतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.