नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या जीवनामध्ये शुभ आणि अशुभ घडामोडी ह्या घडत असतात. प्रत्येकजण आपल्या जीवनात सुखसमृद्धी, पैसा आणि वैभवऐश्वर्य मिळाव्यात यासाठी दररोज वेगवेगळ्या क्षेत्रात कठोर परिश्रम करतो, परंतु कधीतरी आयुष्यात एक टप्पा असाही येतो, जेव्हा आपण सर्व केलेले प्रयत्न अयशस्वी होऊ लागतात.
अनेकवेळा आपण कष्ट करतो, काही काम करतो. तरीदेखील आपल्याला हवेतसे त्या कष्टांना, प्रयत्नांना यश मिळत नाही. आणि एखादे काम पूर्ण झाले नाही, तर त्याला दुर्दैवाशी जोडतो.
कारण आपले नशीब म्हणजेच भाग्य, हे देखील आपल्याला बऱ्याच वेळा साथ देत नाही. आणि या नशिबाने साथ न दिल्यामुळे, आपल्या जीवनात अनेक समस्या, अडचणी येतात.
याउलट बहुतांश व्यक्तींना काहीही मेहनत न करता त्यांना त्यांच्या जीवनात अनपेक्षित यश मिळते. मग आपण त्यांना नशिबाची साथ आहे असे म्हणतो. म्हणजेच मित्रांनो, नशीब चमकणे आणि दुर्दैव, हे सर्व आपल्या दैनंदिन कामे आणि आपल्या कृतींवर अवलंबून असते.
सकाळी उठल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात.ज्या केल्याने नशीब नेहमी आपल्यासोबत राहील. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. आपण आपल्या जीवनात खूप प्रयत्न करतो, कष्ट करतो.
याचाच अर्थ मित्रांनो, ज्या व्यक्तींना जीवनामध्ये नशिबाची चांगली साथ मिळत नाही. त्यांच्या इच्छाआकांक्षा पूर्ण होत नाही. याशिवाय अनेक अपयशांचा सामना करावा लागतो.
आणि आपल्या पैशासंबंधीच्या अडचणीदेखील दूर होत नाही. याचबरोबर मित्रांनो, आपल्या जीवनात काही शत्रूदेखील असतात. आणि त्या शत्रूंचा त्रासदेखील आपल्याला सहन करावा लागतो. तर मित्रांनो, अशा सर्व गोष्टी दूर करण्यासाठी, तुम्ही बरेच प्रभावशाली काही उपायदेखील करू शकता.
आणि सोबतच तुमच्याजवळ काही वस्तूदेखील ठेवू शकता. आणि त्या वस्तूच्या अस्तित्वामुळे, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळून, तुमच्या जीवनात सुखसमृद्धी,
धनसंपत्ती प्राप्त होऊन, सर्व काही समस्या, अडचणी यांच्यापासूनसुद्धा सुटका मिळेल. चला तर मित्रांनो, पाहूया कोणत्या आहेत त्या वस्तू.
सर्वप्रथम आपले नशीब आजमावण्यासाठी, मणिपूर चक्राचा एक साधा उपाय तुम्ही त्या वस्तू तुमच्याजवळ ठेवण्याअगोदर जरूर करावा. मणिपूर चक्र हे आपल्या नशिबाला जागृत करण्याचे काम करते.
आणि हे चक्र मातालक्ष्मी आणि विष्णूचे प्रतीक मानले जाते. मणिपूर चक्राला नाभी चक्र म्हणून ओळखले जाते. मानवी शरीरामध्ये मणिपूर चक्र नाभीच्या.
केंद्रस्थानी स्थित असते. हे चक्र आपल्या नशिबाला बळकट आणि मजबूत बनवते. हे चक्र अग्नीतत्वाचे असून, पिवळ्या रंगाने दर्शविले जाते. आणि सकारात्मक ऊर्जेला सुचित करते.
त्यामुळे मित्रांनो, या मणिपूर चक्राला जागृत करायचे असेल. तर तुम्ही रोज सकाळी स्वच्छ स्नान केल्यानंतर, आपल्या नाभीच्याजवळ आपली बेंबी असते.
त्या बेंबीच्या सर्व बाजूंनी म्हणजेच नाभीच्याभवती हळदीचा लेप लावावा. आणि असा हा हळदीचा लेप आपल्या बेबीभोवती स्नान केल्यानंतरच लावावा.
अगदी गोलाकार गतीने आपल्या नाभीच्या म्हणजे बेंबीच्याभोवती हा हळदीचा लेप लावून, मांडी घालून बसावे. आणि पूर्ण श्वास पोटाद्वारे सोडावा. तसेच मित्रांनो, श्वास सोडताना आपले जे पोट आहे.
जो बेंबीजवळचा भाग आहे, तो फुगायला हवा. जेव्हा आपण श्वास घेतो आहोत, तेव्हा तो बेंबीच्या खालील भागातून जायला हवा. असे 3 वेळा तुम्ही करावे.
आणि असे केल्यानंतरच मणिपूर चक्र हे जागृत होण्यास सुरुवात होते. आणि आपले नशीबदेखील आपल्याला साथ देऊ लागते. आता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू.
काळी हळकुंड: मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्याकडून पैसे प्राप्त करायचे आहेत किंवा कोणालातरी उधारीने दिलेले पैसे परत मिळवायचे आहेत
किंवा एखादी मालमत्ता विकत घ्यायची असेल, तर अशा महत्त्वाच्या पैशासंबंधीच्या व्यवहारांसाठी, तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये काळी हळकुंड ठेऊ शकता.
जर तुमच्याकडे काळी हळकुंड उपलब्ध नसतील, तर तुम्ही काळी हळददेखील ठेऊ शकता. मात्र ही वस्तू तुम्ही तुमच्या पाकीटामध्ये सातत्याने ठेवावी.
तरच त्या वस्तूचा शुभ प्रभाव तुम्हाला काही कालावधीतच नक्कीच जाणवेल. आणि त्या वस्तूच्या अस्तित्वाने तुमची सर्व पैशांच्या संबंधित अडलेली कामे.
काळीमिरी: मित्रांनो, ज्योतिष्यानुसार, आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी काळीमिरी ही आपल्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, अडथळे, अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यास देखील उपयुक्त ठरते. म्हणूनच या काळीमिरीचे काही उपाय केल्याने, अनेक संकटातून सुटका होते.
सोबतच, धनपैसा, वैभव आणि ऐश्वर्याचीसुद्धा प्राप्ती होते. याचबरोबर मित्रांनो, काळीमिरी ही शत्रूपासूनदेखील आपले संरक्षण करते.
आणि शत्रूला देखील आपला मित्र बनवते. मात्र काळीमिरी आपल्याजवळ ठेवण्यापूर्वी एकच नियम तो म्हणजे कर भला तो हो भला! मारुती मंदिरात जाऊन एक लाल धागा मारुतीच्या पायाजवळ ठेऊन नंतर रामरक्षा हनुमान चालीसा बोलून फक्त मुलांनी हा धागा बांधा..