नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तुळशी वृंदावन हे घरात असल्यास नकारात्मक विचार व गोष्टी नाहिशा होतात. त्याने घराच्या परिसरात स्वच्छ हवा राहण्यास मदत होते, पण घरात या दिशेला तुळस लावल्याने अधिक लाभदायक असते. तुळशीचे महत्त्व गरुड पुराणात पण सांगितले आहे.
आयुर्वेदिक तुळशीला संजीवनी म्हणतात, त्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानामध्येही तिचा स्वीकार झाला आहे. तुळशी मुळे आपले वास्तुदोष नाहीसे होतात आणि आर्थिक परिस्थिती बदलते. आपल्या हिंदु धर्मात तुळशीला माता मानले जाते.
हे तुळशी वृंदावन लावण्याची पहिली योग्य दिशा ही उत्तर आहे. कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेराची मानली जाते. त्यामुले आपल्या घरची आर्थिक परिस्थिती बदलेल. जर तुम्हाला उत्तर दिशेला तुळस लावणे शक्य नसेल तर तुम्ही पूर्वेला तुळशी वृंदावन करू शकता.
तसेच पुर्व आणि उत्तर या मधील दिशा म्हणजे ईशान्य दिशेलाही तुळस लावणे योग्य मानले जाते. या तीन दिशा तुळस लावण्यास योग्य आहेत. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त तुळशीचे रोप लावायचे असतील तर त्या विषम संख्येत लावाव्यात.
उदा.1,3,5,7,9 या संख्येत लावावे. तुळशीमध्ये दोन प्रकार पडतात पहिली राम तुळस आणि दुसरी कृष्ण तुळस असे प्रकार पडतात. या दोन्हीही तुळशी आपल्यासाठी चांगल्याच आहेत.
जेव्हा तुमचे तुळशीचे रोप सुखते तेव्हा ते तुम्हाला सावध करत असते की तुमच्या घरावर काहीतरी संकट येणार आहे. जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना जर एक तुळशीचे पान तोंडात टाकले तर ते काम यशस्वी होण्यासाठी मदत होईल.
जर विनाकारण तुमचा पैसा खर्च होत असेल तर नेहमी तुमच्या पाकीटात तुळशीचे एक पान ठेवावे. ज्या लोकांचा उद्योग आहे त्यांनी तुळशीला 3 दिवस पाण्यामध्ये ठेवावे . त्यानंतर हे पाणी आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन शिंपडावे.
तुमचा व्यवसाय जोमाने चालेल. रविवारी , एकादशी आणि ग्रहणाच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. काहीजण ही तुळशीची पाने भगवान विष्णूंना अर्पण करतात पण ही पाने अर्पण करताना पालथी घालावी.
तसेच श्रीराम आणि भगवान हनुमान यांना ही तुळशीची पाने अर्पण करावीत. पण शिवलिंगाला , माता दुर्गा आणि भगवान श्रीगणेश यांना तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नये.
तुळशी वृंदावन लावण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुवार. आपण दररोज सकाळी माता तुळशीला जल अर्पण करावे पण रविवारी मात्र तुळशीला जल अर्पण करू नये. या दिवशी सायंकाळी तुळशीपुढे दिवाही लावू नये.
माता तुळशीसमोर बसून, महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।। हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यावर आपण माता तुळशीची 8 नावे अवश्य घ्यायला हवीत. तसेच,
वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपावनी। पुष्पसारा नंदनीय तुलसी कृष्ण जीवनी।। एतभामांष्टक चैव स्त्रोतं नामर्थं संयुतम। य: पठेत तां च सम्पूज्य सौश्रमेघ फलंलमेता।।
हा मंत्र म्हणा.
याने घरात कोणालाही अकाल मुत्यु येत नाही. जवळपास सर्व वृक्ष आपल्याला सूर्यप्रकाश असे पर्यंत ऑक्सिजन देतात परंतु तुळस ही अशा दुर्मिळ वृक्षांमध्ये गणली जाते की जे वृक्ष 24 तास मानवाला ऑक्सिजन पुरवतात.
देवपूजेत आपल्याला अत्यंत सुख, शांती, समाधान मिळते. म्हणून पूर्ण श्रद्धेने देवपूजा करून नंतर तुलसी पूजन नियमितपणे करायला हवे. घरात आर्थिक अडचणी आल्या की भांडण, वाद होतात, घरात गरिबी असल्याने सर्वांची चिडचिड होते.
यामुळे कुटुंब प्रेम कमी होते. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी पूजा, प्रार्थना करावी. त्यामुळे मानसिक शांती भेटते, तसेच अनेक समस्यांवर उपाय देखील सापडतात. तुळशीजवळ एक अशी वस्तू ठेवा की ज्यामुळे तुळशीसोबतच त्याही गोष्टींचा आशीर्वाद, पुण्य मिळेल व घरात बरकत येईल.
तुळशी सोबत नेहमी शाळीग्राम देवतेची पूजा करावी. भगवान विष्णुच्या पूजा विधी मध्ये नेहमी शाळीग्राम यांचा समावेश असतो. अशी मान्यता आहे की शाळीग्राम नसेल तर भगवान विष्णुची पूजा संपन्न होत नाही.
शाळीग्राम भगवान विष्णुचाच एक अवतार आहे. शाळीग्राम मध्ये भगवान विष्णुचे दहा अवतार सम्मिलित आहेत.अशी मान्यता आहे कि ज्या घरात शाळीग्राम असतात ते घर समस्त तीर्थां पेक्षा श्रेष्ठ असते. शाळीग्राम वर भगवान विष्णुच सुदर्शन चक्र बनवलेलं असत.
तुळशीमाता व शाळीग्राम एकत्र पूजन केल्याने पुण्यच पुण्य भेटते. जसे की तुळशीला हळद कुंकू वाहतो, तसेच शाळीग्रामला चंदनाची पावडर वहा व पूजा करा. याची स्थापना शक्यतो शुभ दिनी करा, एकादशी दिवशी केली तरी चालते.
तसेच एकादशी दिवशी तुळशीपत्र तोडू नये, त्यामुळे आदल्या दिवशीच हे पत्र तोडून ठेवा. एकादशी दिवशी या शाळीग्राम ची स्थापना अर्थात साक्षात भगवान विष्णूंची स्थापना करावी.
चंदनाचा लेप व तुळशी पत्र अर्पण करून तुमच्या घरातील सर्वांसाठी प्रार्थना करा. तुमच्या सर्व समस्या कमी होतील, करणाऱ्या कामात यश मिळेल व सुख, शांती, समृद्धी मिळेल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.