बुधवारी करा हे अत्यंत सोपी उपाय, पैसा येईल, चिंता जाईल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, बुधवार हा भगवान श्री गणेशाचा वार आहे. श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत. आपल्या जीवनात सुखकर्ता व संकट हरण करणारे गणेश आहेत.

या दिवशी गणेशाला दूर्वा वहा, विधिवत पूजा करा. श्री गणेशाला लाडू, मोदक अतिशय प्रिय आहेत त्याचा नैवेद्य दाखवा,

तसेच गणेशाचे पूजन करतेवेळी लाल फुलांचा समावेश नक्की करा. ज्यामुळे श्री गणेश लवकर प्रसन्न होतील.

तुमच्या मनातील इच्छा अपुरी राहिली असेल, तुमचं जर कोणतं काम अडलेलं असेल तर हा भगवान श्री गणेशाचा उपाय नक्की करा,

गणेशाच्या आशीर्वादाने सर्व काही चांगले होईल.

खूप साऱ्या अडचणी सारख्या येत असतील तर श्री गणेशाची प्रतिकात्मक मूर्ती तयार करून घरात बुधवारी स्थापन करा.

तसेच पांढऱ्या रंगाची मूर्ती विधिवत रीतीने स्थापन करा व घरातील सर्वांनी पूर्ण श्रद्धेने घरासाठी गणेशाकडे प्रार्थना करा.

घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. घरात सतत आर्थिक टंचाई असेल तर प्रत्येक बुधवारी गणेशाची विधिवत पूजा करून गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवा.

पूजा झाल्यावर तो नैवेद्य गाईला खायला घाला यामुळे तुमची समस्या दूर होईल. बुधवारी एखाद्या हत्तीला हिरवा चारा खायला घाला, तुमच्या अडचणी दूर होतील,

जवळच्या गणेश मंदिरात जाऊन गणेशाला प्रार्थना करा. घरात कलश जर वाढत असेल, खूप वाद होऊन कटकट होत असेल तर तुम्ही हा उपाय करून पहा.

घरातील कलह हा उपाय कमी करतो किंवा नाहीस करतो. बुधवारी श्री गणेशाची दुर्वांची प्रतिकात्मक मूर्ती बनवून ती आपल्या घरातील देव्हाऱ्यात स्थापन करा,

तिचे यथाविधी पूजन करून दर्शन घ्या असे केल्याने गणेशाचे आशीर्वाद आपल्या घरावर राहतात व त्यामुळे घरात पुन्हा वाद होत नाहीत.

बुधवारी सकाळी स्नान करून एक कांस्य थाळीत चंदनाच्या लेपाने ओम गंगणपतये नमः असे लिहावे.

त्यावरती पाच बुंदीचे लाडू ठेवावेत व ते जवळच्या गणपती मंदिरात जाऊन दान करावेत असे केल्याने अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते

व तुम्हाला गणपतीचे आशीर्वाद मिळतात. बुधवारी गुळाचे २१ छोटे छोटे गोळे व शुद्ध तूप घेऊन जवळच्या गणेश मंदिरात गणेशाला नैवेद्य दाखवावा

व ते प्रसाद म्हणून गरिबांना दान करावेत. गणेशाला प्रिय असणारे दुर्वा व लाल फुल अर्पण करावे.

तसेच बुधवारी गणेशाला प्रिय असणारे बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवून ते गरिबांना द्यावेत.

गूळ आणि शुद्ध तूप गणपतीला दाखवून ते गाईला चारावे. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील दोष कमी होतात व अडचणी देखील कमी होतात.

श्री गणेशाचा षोडशोपचारे अभिषेक करून मनोभावे प्रार्थना करावी. हे सर्व उपाय चमत्कारिक आहेत .

जर श्रद्धेने तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी केले तर तुमच्या सर्व अडचणी बाप्पा दूर करतील. || गणपती बाप्पा मोरया ||

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!