नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्म शास्त्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतं, जीवन जगताना येणाऱ्या अडचणी कशा सर करायच्या हे शास्त्र सांगत, ईश्वरी संकेत, भक्ती खूपच महत्वाचं काम आपल्या जीवनात करत असतात.
हिंदू धर्म शास्त्रानुसार दिवसाचे 24 तास त्यातील दिवस, रात्र, मध्यान्ही असे कालखंड व त्यामध्ये सुद्धा काही दैवी व काही अशुभ ऊर्जेचे वर्गीकरण केले आहे. सकाळच्या वेळी कोणती कामे करावीत व सायंकाळी कोणती कामे करावी व कोणती केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात याचंही स्पष्टीकरण सांगितले आहे.
प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरी अंगणात तुळस असतेच, देवपूजा , तुलसी पूजन हे सकाळी केलं जातं व सायंकाळी देवघरात, तुळशीत दिवा लावला जातो व प्रार्थना केली जाते. अशा प्रकारे तुम्ही रोज सायंकाळी हे काम केलं तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते,
कारण सायंकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असते व तिच्या भक्तांना आशीर्वाद देते. धर्मशास्त्र असे मानते की शास्त्रानुसार तुळशीला विनाकारण स्पर्श करू नये, शास्त्र पध्दतीने कोणता उपाय,
पूजा विधीसाठी जर तुळशीची पाने लागणार असतील तरच ती तोडावीत व तुळशीला स्पर्श करावा अन्यथा करू नये, माता तुळशी अप्रसन्न होते. तसेच जर तुम्ही विनाकारण तुळशीची पाने तोडत असाल,
मंजुळा तोडत असाल तर माता तुमच्या वरती रुष्ट होते. यामुळे तुमचं भाग्य दुर्भाग्य बनते. आपल्या कामात अडथळे येतात व माता लक्ष्मीचा तो अपमान समजला जातो.
संध्याकाळी सूर्यास्तानंतर या वस्तू दान म्हणून किंवा उधार म्हणून देऊ नयेत. बऱ्याचदा आपल्या शेजारचे किंवा इतर कोणीही संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याकडे काही वस्तू मागू शकतात.
काहीही झालं तरीही या पाच वस्तू चुकूनही कोणाला दान देऊ नका. या वस्तू दान म्हणून दिल्याने आपल्या घरातील बरकत निघून जाते. घरातील धनात कमतरता येते. जर आपण वारंवार या वस्तूंचे दान केले तर आपल्या घरात आर्थिक तंगी जाणवू लागते आणि घराची बरकत कधीच होत नाही.
पहिली गोष्ट हळद. अनेकांना ही गोष्ट माहीत असेल की हळदीचा संबंध हा गुरू ग्रहाशी असतो. त्याशिवाय हळदीला लक्ष्मी समजले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये गुरू ग्रह बलवान असतो त्या व्यक्तीच्या नशिबात अपार धनसंपत्ती येते.
जर या लोकांनी सायंकाळी कोणाला हळद दान दिली तर त्यांच्या कुंडलीत असलेला गुरू ग्रह कमजोर पडू शकतो. गुरू ग्रह कमजोर पडल्यामुळे आपल्या घरी पैशांची चणचण जाणवू लागते.
पैशांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संध्याकाळी चुकूनसुद्धा कोणाला हळद देऊ नका. दुसरी गोष्ट पैसा किंवा मौल्यवान वस्तू. संध्याकाळी कोणालाही पैसा किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तू जसे सोने चांदी अजिबात देऊ नका.
आपण पैशाला, मौल्यवान वस्तुना माता लक्ष्मीचा दर्जा देतो. आपण संध्याकाळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवतो, संध्याकाळी माता लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करण्याची वेळ असते.
त्यामुळे माता लक्ष्मीचा दर्जा असलेल्या वस्तू सोने,चांदी,पैसा या वस्तू कोणाला दिल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी चुकूनसुद्धा कोणाला पैसे देऊ नका.
तिसरी गोष्ट म्हणजे दही…दह्याचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. दही आपल्याला सुख समृध्दी प्रदान करतो. हिंदू धर्मात तसा उल्लेख सुध्दा आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर दहीसुध्दा कोणाला देऊ नका.
जी व्यक्ती संध्याकाळी दही दान देईल त्याच्या आयुष्यातून सुख आणि वैभव निघून जाते. सुख आणि वैभव या दोन्ही वस्तूपासून ती वंचित राहते. त्यामुळे चुकूनही दही दान देऊ नये.
चौथी गोष्ट अशी की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध,दही,तूप. अनेकांना आश्चर्य वाटेल की दुधाचा थेट संबंध हा भगवान सूर्यदेव व चंद्रदेव यांच्याशी आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सोबत सुध्दा दुधाचा संबंध आहे.
त्यामुळे सूर्यास्तानंतर चुकूनही दुधाचे दान करू नका. लसूण आणि कांदा. लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध हा केतु ग्रहाशी आहे आणि केतू ग्रह हा अशा ग्रहांशी संबंधित आहे की जो जादू टोण्याशी संबंधित आहे.
आपल्या आसपास असे अनेक लोक असू शकतात की जी कांदा आणि लसूण वापरून आपल्याला त्रास देऊ शकतात. आपल्यावर अनेक चुकीच्या गोष्टी लागू शकतात. आणि म्हणूनच सूर्यास्तानंतर लसूण आणि कांदा कोणालाच दान किंवा उधार देऊ नये.
सूर्यास्तानंतर लसूण कांदा दान देणे हे हिंदू धर्म शास्त्रानुसार अशुभ समजले जाते. तुम्ही या आधी नकळतपणे जर या गोष्टी केल्या असतील तर तुम्हाला नक्कीच समजेल की त्याचे परिणाम हे आपल्याला जाणवत असतातच. म्हणून अशा गोष्टींची काळजी घ्या.
जर तुम्ही मीठ देत असेल तर सावधान, कारण मीठ माता लक्ष्मी च प्रतीक आहे म्हणून सायंकाळी देऊ नका तसेच घरी मीठ संपू देऊ नका, ते खूप अशुभ असते. संपण्या आधीच आणून ठेवत चला.
सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होत असतो, देवी माता लक्ष्मी सर्वांच्या घरी प्रवेश करत असते यावेळी काही आळशी महिला घरी झाडू मारतात. यावेळी स्वच्छता केल्यास लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी घरात वास करते. त्यासाठी लवकर झाडू मारावा.
अलक्ष्मी म्हणजे अमंगल, अरिष्ट, दुःख, दारिद्र्य , गरिबी घरी येते, झाडू ला प्रत्यक्ष माता लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे हा तिचा अवमान समजला जातो म्हणून सायंकाळी झाडू मारण्याचे काम चुकूनही करू नये. यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होते.
महत्वाची गोष्ट , काही कारणाने आपण घरातील व्यक्तींशी वाद घालतो, भांडण, आक्रोश करतो, तर काही घरांमध्ये स्त्रीयांचा वारंवार अपमान होतो, स्त्रियांना तुच्छतेने वागवले जाते,
स्त्री ही घरची लक्ष्मी असते, घराचं सौख्य असते, जर तुम्ही स्त्रियांना हीन वागणूक दिली तर माता लक्ष्मी अप्रसन्न होते व घरातून निघून जाते. त्यामुळे अलक्ष्मी घरात येते, घरातील स्त्री असमाधानी, चिंतीत, अस्वस्थ राहते, परिणामी घरातील सुख नष्ट होते,
त्यामुळे स्त्रियांना त्यांचा आदर सन्मान देणे आवश्यक आहे. ज्यामुळे घरात शांतता राहील, समृद्धी येईल व घरी सुख येईल. त्यामुळे या 3 गोष्टी चुकूनही करू नका.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.