नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्त्रीला लक्ष्मी मानले जाते, हिंदू संस्कृती मध्ये घरातील मुलींना व सुनांना घरची लक्ष्मी मानले आहे. स्त्री घराच उद्धार जसा करते तितकीच ती बरबाद होण्यासाठी कारणीभूत देखील असते.
त्यामुळे घरातील अशी कामे करणाऱ्या स्त्रीचे घर बरबाद होते, कितीही कष्ट केले तरी घरात गरिबी, दारिद्र्य येतेच. असे वर्तन असणाऱ्या स्त्रियांचे पती लवकर कंगाल होतात, प्रगती मध्ये बाधा येतात, वारंवार नुकसान होते.
घरातील ही 5 कामे करणाऱ्या स्त्रीचे घर बरबाद होते तिच्या पतीला नेहमी त्रास होतो, नोकरी व्यवसायात खूप अडचणी येतात.
असे म्हणतात की माता लक्ष्मी आपल्या काही वर्तनामुळे नाराज होते, रुष्ट होते व घरातून निघून जाते. त्यामुळे ही लक्षणे तुमच्यात जर असतील तर लगेच बंद करा. ज्या स्त्रिया घरात नेहमी पाय हलवत असतात, तेही विनाकारण त्यांच्या घरी लक्ष्मी थांबत नाही.
आशा घरातील जो मुख्य पुरुष असतो त्याला सतत त्याच्या कामात अडचणी येऊ शकतात, घरात पैसा टिकत नाही व त्याची नोकरीही जाऊ शकते. म्हणून तुम्ही असे जर करत असाल तर बंद करा. झाडूला आपल्या हिंदू धर्मात लक्ष्मी मानले आहे.
ज्या महिला घरातील झाडूला पाय लावतात, पायाने झाडूला फेकतात अशा घरी लक्ष्मी नांदत नाही. तसेच घरातील जनावरांना उगाच मारहाण करतात. अशा घरी शांतता नांदत नाही व सतत आजारपण असते.
घरातील समृद्धी, भरभराट निघून दारिद्र्य येते. तसेच ज्या महिला खरकटी भांडी किचन मध्येच ठेवतात, बराच वेळ ती घासत नाहीत, रात्रभर ठेवतात अशा महिलांच्या पतीला कर्ज खूप होते व ते कर्ज लवकर फिटत सुदधा नाही.
त्यामुळे खरकटी भांडी कधीही ठेवू नका, घासायला लगेच जमत नसेल तर स्वच्छ विसळून त्यातील खरकटे कचराकुंडीत टाकून मगच झोपा. असे केल्यास लक्ष्मी रुष्ट होणार नाही, नकारात्मक ऊर्जा घरात राहणार नाही.
घरातील मुख्य दरवाजात धनाची देवता प्रवेश करत असते ज्यामुळे तुमच्या घरात भरभराट होत असते. त्यामुळे जर तुम्ही घरच्या दरवाजा तक्रार करत असेल, नीट उघडत अथवा झाकला जात नसेल,
आवाज करत असेल तर ही विनाशाची लक्षणे असू शकतात, खूप मोठे संकट येऊ शकते त्यामुळे त्वरित असा दरवाजा व्यवस्थित ठीक करून घ्यावे.
ज्या महिला उंबरठ्यावर बसून जेवण करतात त्या घरी अशुभ शक्ती वास करते. तसेच जर तुमच्या घरातील महिला सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी झाडू मारत असतील अथवा रात्री घर झाडत असतील तर यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
घरातील महिला जर नेहमी सौभाग्य अलंकार काढून ठेवत असतील, वरचेवर घालत नसतील तर त्यांच्या पतीच्या जीवाला धोका असतो. तसेच घरातील या महिलांमुळे लक्ष्मी रुष्ट होऊन उलट पावलांनी परत जाते.
तसेच जी महिला मोठ्याने कींचाळते, घरातील लोकांना शिवी श्राप देते अशा महिलेपासून लक्ष्मी दूर राहते परिणामी तिच्या परिवरपासून सुद्धा. सकाळी लवकर उठून घर, अंगण स्वच्छ ज्या महिला करत नाहीत त्यांच्या घरी कधीच सुख समृद्धी येत नाही.
वारंवार भांडणे होतात व घरातील शांतता निघून जाते. पायातील पैंजण, जोडवी कधीच काढू नयेत, कारण अशा ठिकाणी माता असता सौभाग्याचा आशीर्वाद देत असते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.