पैसे खेचण्यासाठी जालीम उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, मेहनत तर आपण खूप करतो पण काही वेळी त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून काही उपाय केले तर गुरू बल वाढते. यश अनेक पटीने येते.

चंचल लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण नुसती इच्छा असून काय उपयोग? लक्ष्मी स्थिर कशी होईल हे माहिती असायला हवे. लक्ष्मी कष्टसाध्य असते.घरात शंख ठेवणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते. त्याचा आवाज आजूबाजूला सकारात्मकता आणतो. ज्या घरात शंख ठेवला जातो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते.

नारळाला श्रीफळ असेही म्हणतात, त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. नारळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार याची नियमित पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.ईशान्य आणि दक्षिण पश्चिम दिशा पृथ्वी तत्वाशी संबंधित आहेत.

घरामध्ये या दिशेला मातीपासून बनवलेल्या वस्तू ठेवल्यास ते खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात शांतता राहते.लाफिंग बुद्धा घरात ठेवणे देखील चांगले मानले जाते. बाजारात तुम्हाला लाफिंग बुद्धाचे विविध प्रकार पाहायला मिळतात.

जर तुम्ही तुमच्या घरात पैशाची कमतरता किंवा पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल तर तुम्ही धनाची पेटी घेतलेले लाफिंग बुद्धा घरात ठेवा. ती विकत घेऊन आणू नये, असा समज आहे. एखाद्याकडून भेटवस्तू मिळाल्यावरच ते घरात ठेवणे शुभ असते.

हे नक्की पण तिला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरात नेमकी कशी परिस्थिती असायला हवी ? वातावरण कसे असावे ? लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी व्हावे, तिने आपल्या घरात कायमचा वास करावा असे कोणाला वाटत नाही ?

ही प्रत्येकाचीच इच्छा असते. माणसे सारे आयुष्य त्या लक्ष्मीसाठीच राबत असतात. लक्ष्मी कष्टसाध्य असते हे तर खरेच; पण तिचे आगमन झाल्यावर तिने आपल्या घरी कायम निवास करावा याची अनेकांना प्रतीक्षा असते.

तसं तर जादू-टोणा शब्द नकारात्मक भाव मनात आणतात पण वास्तवात जुन्या काळापासून चालत आलेली भारतीय परंपरेत काही असे टोटके आहे.जे फारच असरकारी असतात. ज्या टोटक्याच्या प्रयोगाने कुणालाही काही नुकसान होणार नसेल असे टोटक्यांचा प्रयोग करण्यात काहीच हरकत नसते. प्रत्येक व्यक्तीला धनाची इच्छा असते.

एखाद्या गुरु पुष्य योग आणि शुभ चन्द्रमाच्या दिवशी सकाळी हिरव्या रंगाच्या कपड्याची लहान पिशवी तयार करा. गणपतीचे फोटो किंवा मूर्तीसमोर ‘संकटनाशन गणेश स्तोत्र’चे 11 पाठ करा.

नंतर या पिशवीत 7 मूग, 10 ग्रॅम साबूत धणे, एक पंचमुखी रुद्राक्ष, एक चांदीचा नाणं किंवा 2 सुपार्‍या, 2 हळकुंड ठेवून उजवी सोंड असलेल्या गणपतीला साजुक तुपाचे मोदक प्रसाद म्हणून लावावे.

नंतर ही पिशवी तिजोरी किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवावी. आर्थिक परिस्थितीत लवकरच सुधार येईल. 1 वर्षानंतर नवीन पिशवी बनवून बदलू शकता.कुठल्याही गणेश चतुर्थीला गणपतीचे उजव्या सोंडांचे चित्र घर किंवा दुकानात लावावे.

त्याची पूजा करावी. त्यांच्यापुढे लवंग व सुपारी ठेवावी. जेव्हा कधी तुम्ही कामावर जात असाल तर या लवंग आणि सुपारीला सोबत घेऊन गेल्याने तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होतील.

रोज एक लवंग आणि सुपारी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. कामावर जाण्याअगोदर लवंग चोखायला पाहिजे व सुपारीला परत गणपतीजवळ आणून ठेवावी व निघताना ‘जय गणेश दूर कर क्लेश’ असे म्हणावे.

ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो. पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते.जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते, भोजन करते, दिवसा झोपते, फाजिल प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते.

आवळ्याच्या झाडामध्ये, गाईच्या शेणात, शंखामध्ये, कमळामध्ये, पांढर्‍या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते.ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता, साधू, गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते. जी स्त्री नियमितपणे गोग्रास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते.

रोज महालक्ष्मीचा ‘ॐ श्री महालक्ष्मै नम:’ मंत्र जपावा. दुकानात/ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणार्‍या मोहक श्रीकृष्णाची तसबीर लावावी.

त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल. व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी ११ रुपये एका गुप्त जागी ठेवावेत. घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत.त्यामुळे व्यापारात सफलता लाभते.गहू दळावयास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून ११ तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते.

व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत. व्यवसायात उन्नती होते. बुधवारी स्नान करून १०८ वेळा हा मंत्र म्हणावा. त्यायोगे व्यवसायात लाभ होतील.

‘ॐ र्‍हीं श्रीं क्रिं, श्रीं क्रिं, नलीं, श्री लीमी ममगृहे धन पुरये चिन्नाई दूरये दूरये स्वाहा.’ गल्ल्यामध्ये, तिजोरीमध्ये, कॅश बॉ्क्समध्ये एक स्फटिकाचे कासव, सोन्या-चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते.

पिंपळ वृक्षाला पाणी घालावे. त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते. सदर पाण्यामध्ये साखर, तूप, दूध घालावे म्हणजे ते प्रभावी, परिणामकारक ठरते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *