बोरचे वास्तुशास्त्र काय सांगते जाणून घ्या नक्की…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, बोर म्हणजेच बोरवेल जर चुकीच्या दिशेला असेल तर घरातील कर्त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ती व्यक्ती म्हणजे कोण तर आपल्या घरातील अशी व्यक्ती जे उद्योग धंदा व्यवसाय नोकरी करते आणि पैसा कमावून आपल्या घरात आणते तर अशा कर्त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात.

बोर चुकीच्या दिशेला असेल सोबतच चुकीच्या दिशेला असलेला मोर आपल्या घरात आर्थिक अडचणी निर्माण करतो पैसा टिकू देत नाही घरातील लोक मानसिक ताणतणावात राहतात. मानसिक आजारांना म्हणून विकारांना बळी पडतात. जलतत्व असणारा हा बोर योग्य दिशेला असणे फार महत्त्वाचा आहे.

एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या घरात बोर घेण्यापूर्वी किंवा तुम्ही आता प्लॉट घेतला जमीन घेतली त्या घेण्यापूर्वी त्या जमिनीची पूजा म्हणजेच भूमिपूजन करून फार महत्त्वाचं असतं. भूमिपूजन केल्याशिवाय जर आपण बोर घेणार असाल तर त्याने सुद्धा अनेक प्रकारचे वास्तुदोष होतो.

वास्तुशास्त्रानुसार बोरवेल आपल्या घरात नक्की कुठे असावा सुरुवातीला काहीच दिशा ज्या आहेत तिथे नसावा. पहिले स्थान म्हणजे ब्रह्मस्थान या ब्रह्म स्थानी आपण चुकूनही बोर घेऊ नका. ब्रह्मस्थान म्हणजे तर आपल्या घराचा केंद्रबिंदू आहे जे सेंटर आहे त्या सेंटरला बोर नसावा.

या ठिकाणी असणारा बोर घरात पैशांच्या समस्या निर्माण करतो . घरात ब्रह्म स्थिती ला बोर असेल तर अशा ठिकाणी चारही बाजुंना पिरॅमिड आपण त्याच्या चारही बाजूंना ठेवणे योग्य ठरेल. घरातील अनेक दोष दूर करू शकतो. वास्तुदोष यापासून मुक्ती मिळू शकतो.

तरी ब्रह्मस्थान या पण चुकूनही बोर घेऊ नका. दुसरी दिशा नैऋत्य दिशा. म्हणजे कोणती दक्षिण आणि पश्चिम यांच्यामधल्या दिशेला नैऋत्य असं म्हणतात ही दिशा शक्यतो जवळ असावी उंच असावी असं वास्तुशास्त्रा मानतं अशा दिशेला जर आपला बोरवेल घेतली तर अशा घरात पैसा टिकत नाही तसेच कर्त्या व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात.

तर तुमच्याही घरात या नैऋत्य दिशेला बोरवेल असेल तर या बोरला आणि यापुढच्या सभोवती आपण ची भिंत बांधा, त्याला हिरवा रंग द्या बोरला सुद्धा हिरवा रंग द्यायचा आहे आणि त्याच्या सभोवती आपण एक कठडा बांधलेला आहे त्याला हिरवा रंग आपण द्यायचा आहे.

त्यामुळे या दिशेला असणारे वास्तुदोष बऱ्यापैकी दूर होतात आणि तिसरी म्हणजे आग्नेय अग्नी दिशा , पूर्व-दक्षिण यांच्यामधल्या दिशेला आग्न्येय असं म्हणतात या दिशेचा अग्नी तत्व आहे आणि अग्नी आणि पाण्याचा सख्य नाही. अग्नि आणि पाणी एकत्र येऊ शकत नाहीत.

तो बोर आपण घेतलेला आहे हे जलतत्व आहे मी पंचतत्व आहे त्यातील एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व याच बोर च्या पाण्याचा वापर संपूर्ण घरात केला जातो प्रत्येक व्यक्तीचे पाणी वापरतात आणि म्हणून हा पाण्याचा एक मुख्य स्थळ आहे स्त्रोत आहे आणि म्हणून अग्नी तत्व असणाऱ्या दिशेला या अग्नेय दिशेला आपण बोर चुकूनही घेऊ नका.

त्यामुळे घरात मानसिक ताण तणाव वाढतात. मानसिक आजार मनोविकार उद्भवतात. लोकांना मानसिक त्रास होतात. तुमच्या घरात या अग्नेय दिशेला बोरवेल असेल तर या ठिकाणी त्या सभोवतीच्या रचना केलेली आहे तो कठडा बांधला आहे त्याला निळा रंग देणे हे श्रेयस्कर ठरेल.

या दिशेला असणाऱ्या बोरवेल पासून उत्पन्न वास्तुदोष दूर करण्यासाठी सोबतच टॉयलेटमध्ये जिन्याखाली घराजवळ आपल्या मुख्य दरवाज्याजवळ आणि बेसमेंटमध्ये चुकूनही बोर घेऊ नये.

टॉयलेटमध्ये, जिन्याच्या खाली, आपल्या देवघराजवळ, मुख्य दरवाजा हे मुख्य दरवाजा म्हणजे या दरवाजातून आपण घरात प्रवेश करत किंवा घराच्या बाहेर पडतो तो दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजाच्या मुख्य दरवाजाजवळ.

त्याठिकाणी चुकूनही आपण बोरवेल घेऊ नका. त्यामुळे अनेक वास्तू दोष उद्भवतात. आता यावरती उपाय ? योग्य दिशा कोणती? बोरवेल घेण्यासाठी जर वर सांगितलेल्या एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या दिशेला तुमच्या घरात बोरवेल असेल तर अशा ठिकाणी एक आरसा लावला की च्याच प्रतिबिंब पडत आहे हा एक उत्तम उपाय आहे.

यातून उद्भवणारे वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि शक्यतो बोर घरात घेण्या पेक्षा घराच्या बाहेर घेतला तर अति उत्तम राहील. या बोर सभोवती जो आपन कटरा करणार आहात तो चौकोनी न बांधता जर गोलाकार बांधला राऊंड शेप मध्ये तर बांधला तर त्याने सुद्धा बऱ्यापैकी वास्तुदोष दूर होतात.

एखादा बोर कोरडा पडलेला असेल तर कोरडा बोर पाणी लागलं नाही किंवा पाणी मात्र आता पाणी अजिबात राहिलेलं नाही तो पूर्ण कोरडा झालेला आहे असा बोर वेळीच बुजवून घेणं बरं असतं.

बोर घेताना तो कधीच घराच्या भिंतीला चिकटून स्पर्श करून घेऊ नये. आता बोरवेल साठी योग्य दिशा आपण समजून घेऊ. बोरवेल साठी ची सर्व योग्य दिशा आहे ईशान्य दिशा. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधल्या दिशेला ईशान्य असं म्हणतात ही देवांची जागा आहे.

मात्र सोबतच याच तत्व जे जलतत्व आहे तो एक प्रतीक आहे आणि म्हणून या ठिकाणी घेतलेला बोर हा सर्वोत्तम मानला जातो. दुसरी दिशा म्हणजे उत्तर दिशा. उत्तर दिशेला असणारा बोर किंवा बोरवेल आपल्या घरात धनधान्य यामध्ये समृद्ध असा निर्माण करतो.

पैशांची आवक वाढवतो. तसेच पूर्व दिशा या ठिकाणी सुद्धा बोर घेऊ शकता ,ही सुद्धा अतिशय शुभ आहे. ईशान्य दिशा आहे म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्यामधील दिशा तर बोर घेताना तो घराच्या कोपऱ्यात घेऊ नका तुमच्या प्लॉटच्या जमिनीच्‍या अगदी कोपर्‍यात घेऊ नका.

तो कोपऱ्यापासून थोडासा पूर्वेकडे किंवा थोडासा उत्तरेकडे असेल याची काळजी घ्या.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!