नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, मंगळसूत्र हा लग्न झालेल्या स्त्री चा महत्त्वाचा अलंकार मानला जातो. पण मंगळसूत्र म्हणजे नक्की काय? मंगळसूत्र हा शब्द दोन शब्दांनी तयार होतो. ‘मंगल’ आणि ‘सूत्र’ अर्थात पवित्र असे सूत्र.
मंगळसूत्राला हिंदू धर्मामध्ये पवित्र सूत्र मानण्यात येते. भारतामध्ये अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालण्याची प्रथा आहे. काही आधुनिक महिला हल्ली मंगळसूत्र घालत नाहीत.
तर काही महिला आता ब्रेसलेट करून हातातही मंगळसूत्राचे ब्रेसलेट घालतात. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लक्षण आहे. हे महिलांचे सर्वात महत्त्वाचे आभूषण आहे. सोन्याचे आणि काळ्या मण्यांनी हे मंगळसूत्र बनते.
गळ्याभोवती अगदी लहान ते छातीच्या खाली इतक्या लांबीचे हे मंगळसूत्र असते. विवाहित महिला मंगळसूत्र घालणे अत्यंत शुभ मानतात.
मंगळसूत्राच्या महत्त्वाचा उल्लेख हा इतिहासकालिन आहे. आदि गुरू शंकराचार्य यांच्या प्रसिद्ध पुस्तक “सौंदर्य लाहिरी” मध्ये याचा उल्लेख असून हिंदू महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे गळ्यात घालतात.
असा समज आहे की, 6 व्या शताब्दीमध्ये भारतातील महिलांनी विवाहानंतर मंगळसूत्र घालण्याची परंपरा सुरू केली होती. मोहेंजदडोच्या खोदकामामध्येही मंगळसूत्राचे प्रमाण सापडते.
कूर्गचा वैवाहिक गळ्यातील हार हा लहान काळे मणी आणि सोन्याने बनविण्यात आल्याचा दिसून येतो. त्यामुळे हे मंगळसूत्र असल्याचे सांगण्यात येते.
याशिवाय प्राचीन काळात अष्टमंगलक माळाही दिसून येते. ज्यामध्ये 8 हे प्रतीक असून मध्यावर एक लॉकेट दिसून येते. याला सांचीच्या बुद्धिस्ट प्रतीक स्वरूपात मान्यता मिळाली होती.
मुलगी जेव्हा विवाह बंधनामध्ये अडकते तेव्हा तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले जाते. पती आपल्या पत्नीला विवाहाच्या दरम्यान मंगळसूत्र गळ्यामध्ये घालत असतो तेव्हापासून त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात होऊ लागते.
एका सवाष्ण ची ओळख तिच्या मंगळसूत्र वरून होत असते.गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले जाते तेव्हा कुमारी पासून तिची ओळख एक सुवासिनी म्हणजेच सवाष्ण याद्वारे जग ओळखू लागते.
अनेकदा मंगळसूत्र म्हणजे लग्नाचे लायसन्स आहे असे म्हणून थट्टा सुद्धा केली जाते परंतु या मंगळसूत्राला आध्यमिक तसेच धार्मिक सुद्धा महत्त्व आहे.
मंगळसूत्र हे सवाष्ण स्त्रीचे शास्त्र मानले जाते अशा महिलेकडे कोणीही वाईट नजरेने पाहत नाही.
मंगळसूत्र मध्ये काचेच्या काळया रंगाच्या दोन पदरी गुंफण केलेली तसेच मध्यभागी सोन्याच्या दोन दोन मणी तसेच मध्यभागी दोन वाट्या असतात अशाप्रकारे मंगळसूत्राची रचना असते.
त्याचबरोबर मंगळसूत्र मधील दोन वाट्या एक हळद म्हणजेच माहेरचे प्रतीक असते तर दुसरे कुंकू म्हणजे सासरचे प्रतीक असते.
मंगळसूत्र प्रमाणेच पती-पत्नी यांचे नाते पवित्र असते आणि त्याच बरोबर आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये लग्नानंतर मंगळसूत्र घालणे पवित्र मानले जाते यामुळे महिलेच्या अलंकार भूषण मध्ये वाढ होते
व त्यांच्या सौंदर्यामध्ये वाढ होतेच पण त्याचबरोबर मंगळसूत्र परिधान केल्याने पतीसुद्धा पत्नीकडे आकर्षित होत असतात अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र या दागिण्याला अतिशय महत्व प्राप्त आहे.
मंगळसूत्र हे नेहमी गळ्यातच का घातले जाते? नेहमी मुलींनीच लग्न झाले आहे असे का दाखवावे असेही प्रश्न आजकाल विचारण्यात येतात.
मात्र वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास, मंगळसूत्राची माळ आणि त्याच्या दोन्ही वाट्या हा महिलांच्या हृदयाच्या जवळ असतात.
या मंगळसूत्रात करण्यात आलेल्या धातूचा वापर हा महिलांच्या हृदयासाठी उत्तम ठरतो. तसंच सकारात्मक ऊर्जा मिळून घरातील स्त्री कायम आनंदी राहते असे म्हटले जाते.
त्यामुळेच साधारण हृदयाला सोन्याचा हा धातू चिकटेल इतक्या लांबीचे मंगळसूत्र करण्यात येते. सध्या या मंगळसूत्राची लांबी कमी झाली असली तरीही मुळात लांब मंगळसूत्र करण्याचा हा वैज्ञानिक हेतू होता.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.