स्वामी सांगतात, रात्री झोपताना म्हणा स्वामींचा हा चमत्कारिक मंत्र, सर्व कामे यशस्वी होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपणा सर्वांचे आराध्यदैवत आपण ज्यांची पूजा करतो जे आपल्याला भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज! पण याचा कधी विचार केलाय का की स्वामीजी अस बोलण्याचा अर्थ काय असेल ? स्वामींनी सांगितलं आहे की तू सत्कर्म करत रहा मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे.

घरातील काही समस्या किंवा जीवनात जर संकटांची रीघ लागली की आपल्याला देवाची आठवण येते. तेव्हा आपण देवाचा धावा करतो. त्यामुळे तात्पुरते क होईना आपल्याला सुख मिळते, थोड्या अडचणी दूर होतात पण चमत्कारिक हे आहे जर आपण नेहमीच वेळ काढून देवाचे स्वामींचे नामस्मरण, मंत्र जप केला तर नेहमीच अडचणींना तोंड द्यायची क्षमता मिळते.

स्वामींची महती भरपूर आहे. स्वामींची सेवा ही केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात. काही लोकांच्या घरी नेहमी सकारात्मक ऊर्जा असते, त्यांच्या घरी शांत वाटते, समाधानी वाटते. तर याउलट काही लोक तक्रार करतात, वाद घालतात, सतत त्वेष करतात व घरातील शांती भंग पावते. अशा घरी अलक्ष्मी वास करते व घरातील सर्व सदस्य नाराज होतात वास्तुदोष तसेच नकारात्मकता वाढते.

जर तुम्ही हा उपाय तुमच्या घराच्या सुखासाठी कराल तर घरातील अशी नकारात्मक ऊर्जा नक्कीच निघून जाईल बऱ्याचदा आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही, वाईट स्वप्न पडतात, सतत कोणता ना कोणता त्रास असतो. तसेच घरातील काही अडचणी सुटत नसतात, समस्या भरपूर असतात, अडचणी खूप असतात पण गुंता मात्र सुटत नसतो.

खूप त्रास होतो, आपले लोक साथ सोडतात, वाईट परिस्थिती येते, घरातील सुख, शांती नाहीशी होते तेव्हा मात्र हा स्वामींचा कानमंत्र नक्कीच तुम्हाला या पेचातून सोडवू शकतो. त्यासाठीच श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मंत्र जप करून पहा, स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. प्रयत्नांना स्वामी यश देतात, पाठीशी उभे राहतात.

अशक्य ही शक्य करतील स्वामी! अस स्वामींच्या बाबतीत म्हणलं जातं. आणि खरंच जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना याचा प्रत्यय नक्कीच आला आहे, स्वामी त्यांच्या भक्तांच्या कठीण प्रसंगात, संकटात नेहमी मदतीला धावून येतात ज्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळतो. स्वामींची माऊली म्हणून देखील पूजा केली जाते.

घरातील आईप्रमाणे आपल्या लेकरावर प्रेम करणारी, आधार देणारी स्वामी माऊली असते. स्वामी भक्तीची चमत्कारिक गोष्ट म्हणजे स्वामी भक्ती केल्यावर स्वामी लगेच दर्शन देतात. लगेच प्रसन्न होतात व आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात.

या मंत्रजपाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, तुम्हाला जर कोणता त्रास होत असेल तर तो सुदधा कमी होईल व घरातील सर्व दुःख दूर होईल. तुमच्या आयुष्यातील अडचणी हटत नसतील तर तुम्ही या मंत्राचा जप करा.

रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. हा मंत्र जर तुम्ही रात्री जप केला तर सकाळी उठून त्याचे सुखद परिणाम लगेच जाणवतील, एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल, तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील.

स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.

त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.

रात्री झोपताना सुद्धा माणूस त्या इच्छांचा विचार करत झोपतो टेन्शन झोपतो की हे मिळेल की नाही होईल का नाही ते दूर होईल का नाही मलाच का असा भरपूर विचार माणसाच्या डोक्यात मनात येत असतात आणि तो त्रास त्याला झोपू सुद्धा देत नाही.

रात्री झोपताना उठताना देवाचे नाव घेऊन हा मंत्र बोलून झोपलात तर नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा आहे त्यासुद्धा पूर्ण होतील तुम्हाला झोप सुद्धा चांगले लागेल आणि उद्याचा दिवस सुद्धा देवाचा आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने चांगला येईल.

म्हणून रात्री झोपताना तुम्ही सुद्धा मंत्र नक्की बोला तुम्हाला फक्त एक वेळेस हा मंत्र रात्री झोपताना बोलायचं आहे महिला असतील पुरुष असतील कोणी त्या मंत्राचा जप करु शकतात देवघरासमोर सुद्धा बसून तुम्ही या मंत्राचा जप करु शकतात.

|| महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || हा मंत्र म्हणजे स्वामींचा गायत्री मंत्र आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी सर्व समस्या दूर होतील, आयुष्यात सुख, शांती, समाधान, वैभव नांदेल.

|| ओम अवधुताय विदमहें, समर्थाय धीमही, तन्नो स्वामी प्रचोदयात || हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपताना म्हणा, मनातील सर्व विचार दूर सारून फक्त स्वामींचे ध्यान करा. हा मंत्र तुम्ही कमीतकमी 11 वेळा व जास्तीत जास्त 108 वेळा म्हणजेच एक माळ जप करू शकता.

या मंत्राचे सामर्थ्य खूप आहे कारण हा स्वामींचा शक्तिशाली मंत्र आहे जो तुम्हाला त्वरित म्हणजेच 24 तासाच्या आत प्रचिती दाखवतो. या मंत्राचा खूप साऱ्या स्वामी भक्तांना अनुभव आला आहे. खूप साऱ्या स्वामी भक्तांच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होऊन स्वामींच्या भक्तीचा त्यांना अद्भुत प्रत्यय देखील आला आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *