नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पाऊस पडताना दिसला तर हे स्वप्न त्याच्यासाठी शुभ मानलं जातं. स्वप्नशास्त्रानुसार, या स्वप्नाचा अर्थ असा होतो की येणार्या काळात त्या व्यक्तीला आनंदाची बातमी मिळणार आहे किंवा ती व्यक्ती करत असलेल्या कामात तिला यश मिळेल
स्वप्न पाहणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. झोपेत आपण सर्व जण स्वप्न पाहतो. स्वप्नशास्त्राच्या मते, आपली स्वप्नं आपल्याला भविष्यातील गोष्टींबद्दल संकेत देतात. काही स्वप्नं चांगली असतात तर काही स्वप्नं वाईट असतात.
प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नांमध्ये काहीतरी असं नक्की पाहते, ज्यातून त्याला भविष्यातील काही प्रकारचे संकेत मिळतात. सकाळी उठल्यानंतर अनेकांना त्यांची स्वप्नं आठवत नाहीत. तर काही लोकांना त्यांची संपूर्ण स्वप्नं स्पष्टपणे आठवत असतात.
स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पुराचं दृश्य पाहणं अशुभ आहे. सामान्य जीवनातही पुरामुळे जनजीवन विस्कळीत होतं. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नात पुराचं पाणी दिसत असेल, तर येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात संकटं येऊ शकतात किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातून काही वाईट बातमी मिळू शकते.
स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात विहिरीचं पाणी दिसलं तर ते त्याच्यासाठी शुभ मानलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात अनेकदा विहिरीचं पाणी दिसत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ आहे. याचाच अर्थ भविष्यात लवकरच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.
खरं तर आपल्याला कोणतं स्वप्न पडावं, हे आपल्या हातात नसतं. पण त्या स्वप्नांचे अर्थ मात्र नक्कीच असतात. अर्थाशिवाय कोणतंच स्वप्न नसतं. फक्त आपल्याला त्याचे अर्थ लावता यायला हवेत.
स्वप्नात पाणी दिसणं शुभ की अशुभ हे तुम्ही पाणी कोणत्या स्वरुपात पाहिलं, त्याच्यावर अवलंबून असतं. जर तुम्ही विहिरीचं पाणी पाहिलं, तर ते शुभ असतं.
जर तुम्ही पावसाचं पाणी पाहिलं, तर ते शुभ असतं. पण त्याचवेळी जर तुम्ही पुराचं पाणी पाहिलं असेल तर ते अशुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या स्वप्नात तुम्ही जे पाहिलं, त्यावरून त्याचे अर्थ लावले जातात
आणि ते तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे, हे ठरवलं जातं.स्वप्नं शास्त्रानुसार स्वप्नात समुद्र दिसला तर ते शुभ मानले जात नाही. वास्तविक पाहता समुद्र खूप खोल आहे आणि त्यात एक जिवन असते.
त्यामुळे हे पाणी पाहणे खूपच धोकादायक मानले जाते. असे पाणी पाहील्यास भविष्यात अशा काही समस्या समोर येऊ शकतात, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. समुद्राचे पाणी देखील पैशाचे नुकसान आणि कोणत्याही अपघाताचे लक्षण असू शकते.
अशा परिस्थितीत तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे.स्वप्न शास्त्रानुसार नदीचे पाणी पाहणे शुभ मानले जाते. धर्मग्रंथात नदीला पवित्र मानले गेले आहे. नदीत स्नान केल्याने पाप धुऊन जाते. नद्यांचे पाणी माणसाच्या जीवनासाठीही खूप उपयुक्त आहे.
अशा वेळी जर तुम्हाला नदी दिसली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास आता संपू शकतात. तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.स्वप्न शास्त्रानुसार स्वच्छ पाणी पाहणे देखील शुभ मानले जाते.
हे तुमची स्वच्छ प्रतिमा दर्शवते. जर तुम्हाला असे काही दिसले तर समजून घ्या की कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा वाढू शकतो, अशा स्थितीत तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. याशिवाय समाजात वाढता आदरही दर्शवतो.
त्याच प्रमाणे तुमच्या यशामध्ये वाढ होऊ शकते.पावसाचे पाणी माणसाला यश दर्शवते. असे म्हणतात की जर तुम्हाला पावसाचे पाणी दिसले तर समजून घ्या की तुम्हाला धनाचा मोठा फायदा होईल.
कारण पावसाचे पाणी पिकाचे पोषण करते आणि पीक हे समृद्धीचे प्रतीक आहे. पावसाचे पाणी पाहून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.