अशी स्वामी सेवा करा, रोज इथे 1 दिवा लावून अशी प्रार्थना करा, स्वामी नक्की प्रसन्न होतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपण दररोज स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतो; पण पूजा करतेवेळी आपण कोणत्या चुका करतो हे तुम्हाला आज माहीत असायला हवे, जर या चुका तुम्ही दररोज करत असाल तर तुम्ही आज पर्यंत पूजा केलेली व्यर्थ आहे.

कारण स्वामी समर्थ महाराजांना या दोन गोष्टी कधीच आवडत नाहीत. त्यामुळे या दोन गोष्टी कोणत्या आहेत ते नक्की जाणून घ्या ज्या तुम्हाला स्वामी आशीर्वादापासून कधीच वंचित ठेवणार नाहीत.

जर या चुका तुम्ही वेळीच टाळल्या नाहीत तर स्वामी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत, कारण अशी पूजा स्वामींना अमान्य आहे.

1. स्वामी समर्थ महाराजांना कधीही हळदी कुंकु लावायचे नाही. आपण दररोज स्वामीची पूजा करतो आणि पुजा करतेवेळी आपण स्वामींना हळदी कुंकु लावतो. पण स्वामींना हळदी कुंकु कधीच आवडत नाही त्यामुळे तुम्ही ही चूक कधीच करू.

स्वामींना हळदी-कुंकु लावण्याऐवजी काय लावावे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर श्री स्वामी महाराजांना हळदी-कुंकु लावण्याऐवजी अष्टगंध लावण्यात यावा कारण स्वामींना अष्टगंध खूप प्रिय आहे.

हे असे दररोज केल्याने स्वामींची आपल्यावर कृपादृष्टी राहते व स्वामी समर्थ आपल्यावर कोप पावत नाही. सेवा कोणतीही असो प्रसन्न करण्याचा मार्ग प्रिय वस्तूंपासून येत असतो,

त्यामुळे तुम्हाला जर लवकर प्रसन्न करून घ्यायचे असेल तर स्वामींच्या सेवेतील जास्तीत जास्त नियमांचे पालन करा. ज्यामुळे स्वामींची तुमच्यावर सदैव कृपा बरसेल.

2. स्वामींना नैवेद्य दाखवतेवेळी या चुका करू नका. आपण पूजा करून झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवत असतो त्यामुळे स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे ज्यामुळे हा नैवेद्य स्वामी मान्य करतात.

स्वामींना नैवेद्य दाखवतेवेळी बरेचजण स्वामींचे कोणतेही नियम पाळत नाहीत आणि हे स्वामींना मुळीच आवडत नाही. त्यामुळे कधीही स्वामींना नैवेद्य दाखवते वेळी त्यावर दोन तीन तुळशीची पाने ठेवायला हवीत.

नैवेद्य असलेल्या ताटाखाली पाण्याने चौकोन तयार करावा आणि त्यावर नैवेद्य ताट ठेवावे. स्वामी समर्थ महाराजांसाठी आपण जेवढे पदार्थ बनवले आहेत त्या प्रत्येक पदार्थावर एक एक तुळीशीची पाने ठेवावीत.

एक कलश पाणी स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवावे. या नियमांचे पालन करून स्वामी समर्थ महाराजांना दररोज नैवेद्य दाखवावे.

हे अर्पण केलेले जल अमृततुल्य असते त्यामुळे हा महानैवेद्य व जल आपण व घरातील सर्वांनी सेवन करा, ते वाया कधीच घालवू नये,

त्याची चांगली अनुभूती देखील तुम्हाला नक्कीच येईल. या नियमांचे पालन केले तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्यावर त्यांची कृपादृष्टी चिरकाल राहील.

स्वामींची प्रतिमा रोज अंघोळ झाल्यावर पूजन झाली पाहिजे. तसेच आपल्या घरी शुद्धता राहिली पाहिजे.

रोज सायंकाळी शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवस स्वामींच्या समोर लावून प्रार्थना करा. रोज हा नियम कराच. बघा थोड्याच दिवसात कशी प्रचिती येते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!