स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा कोणती ज्याचे फळ अनपेक्षित असते?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामींची सेवा करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काही गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे लागते. त्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या ज्यामुळे तुमच्या सेवेत चुका होऊ नयेत.

अनंतकोटी ब्रम्हांडनायक योगीराज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा जयघोष ज्या घरी असतो तिथे स्वामींचा वास असतो. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा सेवेकरी असणे म्हणजे आपलं सद्भाग्यचं म्हणावं लागेल.

सेवेकऱ्यांचं नातं हे पवित्र, शुद्ध, निस्वार्थी, प्रामाणिक व भोळे असते. रक्ताच्या नात्यापेक्षा सेवेकऱ्यांचं नातं हेच आपल्या सुख दुःखात मदत करते कारण स्वामींचे सेवेकरी नेहमीच भावाप्रमाणे मदत करतात, त्यामुळे तुम्हीही जाणून घ्या की हे नाते म्हणजे कसे व सेवेकरी कसा असतो.

अपंगांना, वृद्धांना, संकटात सापडणाऱ्यांना मदत करणे हाच सेवेकाऱ्याचा धर्म असतो, ही सेवा स्वामीच आपल्याकडून करून घेतात, निस्वार्थी पणे प्रत्येक सेवेकरी ती करत असतो.

इतरांना केलेली मदत ही स्तुतिप्रिय जरी असली तर सेवेकऱ्याला त्याच मोल नसते कारण तो सर्व कामे स्वामींना अर्पित करतो

व त्यामुळे तो अहंकारी नसतो व मोठेपणा घेण्यासाठी हावरट देखील नसतो. तसेच आपण करत असलेली सेवा स्वामी चरणी अर्पून तो सतत तेच करतो

व त्याच्या जीवनात सुखी समाधानी राहतो, स्वामीजी अशा प्रामाणिक सेवेकऱ्याला भरपूर देतात व त्याच्या प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी असतात.

इतरांची टिंगल टवाळी न करणे, इतरांना कमी लेखणे, इतरांना त्यांच्या दोषावरून हिनवणे व इतरांना टोमणे मारणे हे एका सेवेकऱ्याचं लक्षण नाहीये.

याउलट तो कोणाची निंदा करत नाही, चुकीचे असेल तर समजून सांगतो, स्वामींची भक्ती कशी करावी याचा प्रसार करतो व सर्वांनी मिळून सेवा कशी करायची याचं ज्ञान

देतो. तुम्ही जर सेवेकरी असूनही तुम्हाला अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्हाला आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे कारण स्वामींना चारित्र्यहीन सेवेकरी आवडत नाहीत,

जे लोक सोंग करतात त्यांना स्वामी साथ देत नाहीत, जे लोक त्यांचं काम, चारित्र्य, सेवा प्रामाणिकपणे स्वामींच्या चरणी अर्पण करत नाहीत

त्यांच्या सेवेला मोल नसते कारण सर्वकाही करण्यासाठी स्वामीनीच आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेले असते त्यामुळे या गोष्टी सेवेकरीने लक्षात ठेवायला हव्यात.

कोणाबद्दलही अजाणतेपणी चुकीचे मत ठरवू नये, तसे त्याला दोषी ठरवू नये व त्यामुळे तुम्हीच स्वतःच्या द्वेषाच्या अग्नीत जळत असता

त्यामुळ तुमचं मन सेवेत न रमता इतरत्र भटकू लागते. मदत करणे व त्यामुळे त्याला सारख बोलून दाखवणे हे चुकीचे असते.

अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींचे बोधवाक्य लक्षात ठेवून आपण नेहमी सत्कर्म करत रहावे.

त्यामुळे स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात व आपण सेवेत रमून जातो त्यामुळे अहंकार, लोभ, वाद विवाद, स्वार्थीपणा आपल्या आयुष्यात येत नाही.

स्वामींचा सेवेकरी हा निर्मळ, स्वच्छ मनाचा, नेहमी पारदर्शी व्यवहार करणारा, कितीही मोठा असेल तरी अहंकार न बाळगणारा असा असतो.

स्वामींची सेवा करताना खोटी न करता , ढोंगी न वागता, पूर्ण श्रद्धेने, तन मन वाहून संपूर्ण मनाने फळाची अपेक्षा करू नये

या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. स्वामींची आवडती गोष्ट म्हणजे खरे बोलणे, प्रामाणिक पणे कष्ट करणे आणि स्वामी चरणी अर्पण करणे. स्वामी सदैव रक्षण करतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!