बुधवारी करा अशी स्वामीसेवा, निश्चित तुम्हाला फळ मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ , आपल्या मनात बऱ्याच इच्छा असतात, बऱ्याच गोष्टी व्हाव्या अस आपल्याला वाटत असतं, ते स्वामींना कसं सांगावं, स्वामीना कशाप्रकारे प्रार्थना करावी? या गोष्टी पूर्ण होण्यासाठी काय काय करावं?

बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांचा असा गोंधळ होतो, त्यामुळे सर्वात प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींना प्रार्थना कशा प्रकारे करायची? यासाठी आधी तुम्ही ठरवा कि तुम्ही काय करत आहात? काय होणे अपेक्षित आहे?

तुम्हाला हवी असणारी गोष्ट कशा पद्धतीने व्हावी हे तुम्हाला अपेक्षित आहे? हे स्वतः ठरवायचं आणि मग स्वामींशी हे सगळं बोला , स्वामींना हे सगळं सांगा, अगदी मनापासून सांगा, मन मोकळे करा.

जसे की तुम्ही एखादी परीक्षा देत असाल तर अशा प्रकारे म्हणायचं, की स्वामी मी अमुक ही परीक्षा देत आहे, या प्रवासात तुम्ही सोबत राहा, मला योग्य मार्गदर्शन करा, माझ्याकडून चांगला अभ्यास करून घ्या, अशा प्रकारे हे बोलायचं आहे.

इतर वेळी अशी प्रार्थना केंद्रात जाऊन स्वामींच्या मठात जाऊन व्यवस्थित स्वामीं समोर बसून करायची असते, पण सध्याच्या परिस्थितीत घरीच देवार्यासमोर स्वामींच्या फोटो समोर जरी उभ राहून स्वामींना प्रार्थना केली तरी चालेल.

स्वामी तुम्हाला समजून घेतील. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धापूर्वक भावाने ही प्रार्थना करायची. अंतर मनापासून करावी.प्रार्थना करायची आहे, कारण आपण स्वामींना ऑर्डर देत नाही,

की काही लोक असेच ऑर्डर दिल्यासारखी प्रार्थना करतात आणि मग स्वामीना सांगितलं,पण तसं नसते, श्रद्धेने प्रेमाने आणि अंतर मनापासून ही प्रार्थना करा. आता पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास, स्वामींवर अतूट आणि अभेद्य विश्वास हवा.

स्वामींची कृपा आपल्यावर असते, स्वामींचे लक्ष असतं, स्वामी सगळं काही योग्य वेळी योग्य गोष्ट आपल्याला देत असतात. जेव्हा केव्हा नकारात्मकता तुमच्या मनात येईल लगेच त्याच वेळी स्वतःला थांबवायचं, स्वामींचे नाव घ्यायचं,

स्वामींचे नामस्मरण करायचं आणि स्वतःच्या मनाला सांगायचं की स्वामी माझ्यासोबत नेहमी असतात. माझं सगळं चांगलं होणार. स्वामी माझ्यासोबत आहेत.

स्वतःला अजिबात कुठल्याही प्रकारे सकारात्मक सूचना द्यायच्या आणि तुम्ही प्रार्थना स्वामींना केली की स्वामींची कृपा आपल्यावर असते.

स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. यामुळे स्वामींवर आणि स्वतःवर विश्वास असणे खूप महत्त्वाचे. तुम्ही स्वामींकडे इच्छा व्यक्त केली की स्वामी पण तुमची परीक्षा घेतात ते पण बघतात किती विश्वास आहे माझ्यावर?

आपल्या स्वामींचा तारक मंत्र आहे की , भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे त्यामुळे अशी स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असताना आपण स्वतःवर विश्वास स्वामींवर सुद्धा विश्वास आणि संशय अजिबात धरू नका.

स्वामींच्या मठात वरच्या बाजूला लिहिलं होतं की निःशंक ये आणि मग बाहेर पडताना दरवाजाच्या वरच्या बाजूला लिहिलेलं होतं की निःशंक जा.

स्वामी दर्शन असो किंवा कोणतंही काम, निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे म्हणून आपण जायचं आणि स्वामीनी सांगितलं आहेच

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, एवढं सगळं असताना का म्हणून आपण मनात भीती बाळगायची आणि का म्हणून निराश नाराज होऊन स्वतःला तुम्ही त्रास करून घ्यायचा?

ही निराशा या गोष्टी तुमची इच्छा पूर्ण होण्याच्या मध्ये व्यत्यय आणत असतात, म्हणून पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन सतत नामघोष करून इच्छा व्यक्त करा व तुमचं काम प्रामाणिकपणे करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *