अंघोळ करताना बोला हे शब्द रोग, संकट, शत्रू सर्व पळून जातील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्म शास्त्र बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत असते त्यामुळे आपलं जीवन सुख व शांतीने भरलेलं राहते दिवसाची सुरुवात ज्या गोष्टीने होते व दिवसभर आपल्या चैतन्य रुपी वाटते ती म्हणजे सकाळची अंघोळ.

अंघोळ करत असताना हे शब्द नक्की बोलत चला, अगदी दररोज नित्यनियमाने. लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे शब्द बोला आणि त्यानंतर स्नान करा.

आपल्याला दिसून येईल की आपल्या जीवनात जे आजार आहेत, रोग आहेत, एखादं संकट आहे किंवा एखादी व्यक्ती विनाकारण त्रास देते, तुमची शत्रु आहे त्या सर्वांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. रोग, संकटे, शत्रू अगदी पळून जातील. खरंतर हा एक मंत्र आहे.

सकाळी अंघोळ करताना दररोज हा मंत्र म्हणत चला. हा देवाधिदेव महादेवांचा मंत्र आहे. ज्या व्यक्तीवर भगवान शंकर प्रसन्न होतात त्या व्यक्तीला अगदी काळ सुद्धा त्याचं काहीही करू शकत नाही.

कारण शिवशंकरांचे मंत्र हे अटळ असतात. अगदी कोणत्याही शारीरिक व्याधीपासून मुक्ती हवी असेल तर आपण या मंत्राचा जप सकाळी करू शकता. जप म्हणजे केवळ एकदा उच्चारण करायचे आहे.

आज आपण जो मंत्र सांगणार आहोत की जो अंघोळ करण्यापूर्वी म्हणायचा आहे, तो मंत्र महामृत्युंजय मंत्र. आपल्यापैकी अनेकांनी हा मंत्र ऐकला असेल. मात्र त्याची विधी कशी आहे त्याचा वापर कसा करायचा ते मात्र समजून घ्या.

मित्रांनो जितका जास्त या मंत्राचा वापर कराल तुमचं शरीर तितकं जास्त निरोगी राहील, व्याधीमुक्त राहील. मृत्यू, काळ हा तुमच्यापासून तितका दुरावेल.

अंघोळीला जाताना आपण ज्या मगाचा वापर करतो, ते मगभर पाणी आपण घ्यायचं आहे किंवा तांब्याभर पाणी घ्यायचं आहे.

त्यामध्ये आपली उजव्या हाताची जी करंगळी आहे म्हणजे शेवटचं बोट आहे तर ही करंगळी बुडवून आपण हा मंत्र म्हणायचा आहे.

मंत्र आहे “ओम होम ज्यूम स्वाहा”.  अठरा वेळा या मंत्राचा जप करायचा आहे, उच्चारण करायचे आहे आणि त्यानंतर हे मंत्राने सिद्ध झालेले, भारलेले जल आपण डोक्यावरती टाकायचे आहे.

ते पाणी डोक्यावर टाकून आपण स्नान करायचे आहे. महिलांच्या बाबतीत हे पाणी दररोज डोक्यावर घेण्याची गरज नाही.

आपण आपल्या अंगावरती हे पाणी घेतलं तरी चालेल. लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे आईवडील, त्यांचे पालक त्यांच्यासाठी या मंत्राचा जप करून या लहान बालकास स्नान घालू शकता.

हा मंत्र आपल्या शरीराचे रक्षण करतो. एकप्रकारचे रक्षाकवच तो आपल्या शरीराभोवती निर्माण करतो.

तुमच्या जीवनात जर खुप शत्रु निर्माण झाले असतील तर त्या शत्रूंचे भय नष्ट होईल. तुम्ही त्या शत्रूंचा चांगल्याप्रकारे मुकाबला करू लागाल.

शत्रूंची कोणत्याही प्रकारची जी चलाखी आहे ती चालणार नाही. संकटांपासून तुमचे रक्षण होईल.

तसेच तुम्ही गंगा सिंधू सरस्वती गोदावरी नर्मदा या पावन पवित्र नद्यांना आवाहन करा व माझ्या स्नानाच्या जलामध्ये तुमची पवित्रता लाभो आणि मी निरोगी राहो हीच प्रार्थना करा. त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!