पोट आणि वजन कमी करन्यासाठी रुटीन…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, वजन एकदा वाढायला सुरुवात झाली की झपाझप वाढते पण कमी होताना मात्र खूप वेळ जातो. वजन कमी करणे ही मोठी समस्या असली तरी योग्य ते नियोजन आणि सातत्य यामुळे आपण ही गोष्ट नक्कीच साध्य करु शकता. वजनाचे मॅनेजमेंट करण्यासाठी काही ठराविक गोष्टी नियमित करण्याची आवश्यकता असते.

या गोष्टी कोणत्या वेळेला, किती प्रमाणात आणि कशापद्धतीने करायच्या याची माहिती असायला हवी. यासाठी आवश्यक आहे ठराविक मॉर्निंग रुटीन फॉलो करण्याची. असे बरेच लोक असतील ज्यांनी आपल्या नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये वजन कमी करणे हे ध्येय समाविष्ट केले असेल आणि काहींनी जिमला जाणे देखील सुरू केले असेल. पण तुम्हाला माहित आहे का की वजन कमी करण्यात व्यायामाची भूमिका फक्त 20 टक्के असते तर उर्वरित 80 टक्के रोल हा आहाराचा असतो.

अशा परिस्थितीत तुम्ही व्यायाम तर कराल, पण खायचे काय हा प्रश्न महत्त्वाचाच आहे. जगभरातील न्युट्रिशनिस्ट अनेकदा लोकांना अन्नाविषयी योग्य माहिती जाणून घेण्याचा सल्ला देतात.

आपल्यासाठी काय खाणं योग्य आहे आणि काय नाही हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं असं ते म्हणतात. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही पायरी तुमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे की तुम्ही तुमच्या ताटात काय ठेवावे जेणेकरून वजन कमी करणे सोपे होईल.

न्युट्रिशनिस्ट वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेण्याचा सल्ला देतात. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्लेटच्या एक चतुर्थांश भागामध्ये प्रोटीन, एकामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि उर्वरित अर्ध्या भागामध्ये भाज्या समाविष्ट केल्या पाहिजेत.

याशिवाय एक किंवा दोन चमचे गुड किंवा हेल्दी फॅट असणे देखील महत्त्वाचे आहे.

जेव्हा गोष्ट कर्बोदकांची किंवा कार्ब्सची येते तेव्हा तुम्हाला तुमच्या आहारात साधे कार्ब्स नाही तर कॉम्प्लेक्स म्हणजेच कठीण कर्बोदके समाविष्ट करावे लागतील. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स तुमचे वजन संतुलित करण्यासाठी आणि जीवनशैलीतील विकारांपासून तुमचे संरक्षण करण्यासाठी कार्य करतात.

तुम्ही त्यात संपूर्ण धान्य, बीन्स, फायबरयुक्त पदार्थ आणि फळे समाविष्ट करू शकता. आहारात प्रथिने असणे आवश्‍यक आहे कारण ते तुमचे पोट भरलेले ठेवते, भूक कमी करते आणि स्नायू वाढवण्‍यास मदत करते. यासाठी तुम्ही चिकन, सोया फूड्स, ओट्स, बदाम, मासे इत्यादींचे सेवन करू शकता.

सहसा लोक वजन कमी करताना आहारातून फॅट वगळतात. पण ते अजिबात योग्य नाही. आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला तुमच्या आहारात चांगल्या फॅटचा समावेश करावा लागेल. याद्वारे तुमचे वजन कमी करणे सोपे होऊ शकते.

यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, तूप, नट्स, सीड्स म्हणजेच फळांच्या वाळवलेल्या बिया इत्यादींचा समावेश करू शकता. याशिवाय आतड्यांच्या आरोग्याकरिताही आहारात हेल्दी अन्नाचा समावेश करावा.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर गोष्टी साध्यासोप्या ठेवा. स्वतःवर कोणतीही बंधने लादू नका. त्यापेक्षा तुम्ही काय आणि किती प्रमाणात खात आहात यावर लक्ष द्या. वजन कमी करताना हा मूलमंत्र उपयोगी पडतो.

आपल्यातील अनेक जण सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा घेतात. कॅफेन असलेल्या पेयाने दिवसाची सुरुवात करणे योग्य नाही. त्यामुळे आपण दिवसाची सुरुवात वेट लॉस ड्रींकने करायला हवी. त्यामुळे प्रतिकारशक्ती तर वाढेलच आणि वाढलेली जास्तीची चरबी कमी होण्यासही मदत होईल.

अर्धा चमचा चिया सीडस रात्रभर किंवा एक तास पाण्यात भिजवून ठेवा. कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस घाला. हे एकत्र करा आणि त्यामध्ये भिजलेल्या चिया सीडस घाला.

चिया सीडसमुळे तुमचे पोट काही काळासाठी भरलेले राहते आणि त्यामुळे तुम्हाला पुढचा काही वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुम्ही जास्त खात नाही. तर लिंबू पाण्यामुळे तुमचे फॅटस बर्न व्हायला मदत होते.

पाण्यात सफरचंदाची फोड आणि दालचिनी घालून ते पाणी पिल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो. उन्हाळ्यात याचा अतिशय चांगला फायदा होतो.

जीरा पाणी हेही वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरु शकते. पचनाच्या तक्रारींवर जीरा पाणी अतिशय चांगले असल्याने गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांसारख्या पचनाशी निगडीत तक्रारी दूर होण्यास मदत होऊ शकते.

पचनाच्या तक्रारी दूर झाल्या की वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जीरा पाणी हा उत्तम उपाय आहे. एक ग्लास पाण्यात साधारण एक चमचा जीरे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर ते पाणी ३ ते ५ मिनीटे उकळा आणि गाळून प्या.

दररोज मॉर्निग ड्रींक घेतल्यानंतर ३० ते ४० मिनीटे न चुकता चालायला जा. चालण्याच्या व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ब्रिस्क वॉक म्हणजेच थोडे वेगाने चालावे, त्यामुळे आपल्याला आतून फ्रेश वाटते.

ब्रेकफास्टच्या आधी चालल्यामुळे तुमचे फॅटस योग्य पद्धतीने बर्न होतात. तसेच सकाळी चालण्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाशही मिळतो. म्हणून वजन कमी करायचे असल्यास सकाळी लवकर उठून चालायला जाणे सर्वात उत्तम आहे.

चालून आल्यानंतर न चुकता रोज किमान २० मिनीटांसाठी योगासने करा. त्यामुळे तुमच्या स्नायूंची ताकद तर वाढेलच पण शरीर लवचिक होण्यासही त्यामुळे मदत होईल. योगासनामुळे जास्तीच्या कलरीज बर्न व्हायलाही मदत होईल.

तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या शरीराला झेपेल, आवश्यक असेल अशी आसने निवडा आणि नियमितपणे ती करा. शरीराला आकार येण्यास त्याचा निश्चित फायदा होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!