नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, चांगले भाग्य कोणाला नको असते आणि भाग्याची साथ मिळविण्यासाठी लोक वाट्टेल ते उपाय करत असतात. पण वास्तूमध्ये भाग्याची साथ मिळवण्यासाठी अतिशय सोप्या टिप्स देण्यात आल्या आहेत.
वास्तूमध्ये असे मानले जाते की, जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता नसेल किंवा बुट आणि चप्पल विखुरलेल्या असतील तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश थांबतो. वास्तूसंबंधी हे उपाय केल्यास आणि मुख्य प्रवेशद्वारावर या गोष्टी लावल्यास भाग्य साथ देण्यास सुरवात करते.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते. त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते.
घर एक असे ठिकाण असते जिथे व्यक्तीला शांती तसेच प्रसन्नता मिळते. कामावरून घरी आले की घरात प्रसन्न वाटले पाहिजे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातही काही बदल कऱण्याची गरज असते. घराचा मुख्य भाग असतो ते म्हणजे प्रवेशद्वार. घराच्या दरवाजावर अशा काही वस्तू ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे सकारात्मक बदल होईल.
मुख्य दरवाजाची दिशा वास्तुशास्त्राचा एक महत्त्वाचा भग असतो. घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास सगळ्यात उत्तम मानले जाते. यामुळे आयुष्यात नेहमी विजय, सुख तसेच शुभ घटना घडतात. उत्तर दिशेला दरवाजा असल्यास ते कुबेराचे दार मानले जाते. या दिशेला दरवाजा असल्यास धन तसेच सुखप्राप्ती होते.
काचेचे भांडे – घराच्या प्रवेशद्वारावर काचेचे भांडे जरूर ठेवा. यात सुगंधित फुले टाका. यामुळे घरात सकारात्मकता येईल. तसेच आनंदही घरात येईल.
माळा – अनेकांच्या घराच्या प्रवेशाद्वारावर माळा तुम्ही पाहिली असेल. घराच्या दरवाजावर पिंपळ, आंबा अथवा अशोकाच्या पानांची माळ लावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल. तसेच घरात समृद्धी येईल.
लक्ष्मीची पावले – घराच्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीची पावले नक्की लावा. तसेच ही पावले लावताना त्यांची दिशा घराच्या आतील दिशेस हवीत. लक्ष्मी घरात प्रवेश करत आहेत अशी लावावीत. यामुळे घरात समृद्धी येते.
शुभ-लाभ – घराच्या मुख्य दरवाजावर शुभ-लाभचे निशाण असणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी निवास करते. स्वस्तिक – लक्ष्मीची पावले, शुभ-लाभ या व्यतिरिक्त स्वस्तिकचे निशाणही घराच्या दरवाजावर लावणे शुभ मानले जाते.
असे केल्याने सौभाग्य आणि समृद्धी वेगाने वाढते. घराचा मुख्य दरवाजा हा इतर दरवाजांच्या तुलनेत मोठा असला पाहिजे याची काळजी घ्या. तसेच हा दरवाजा घड्याळाच्या दिशेने उघडला पाहिजे. घराच्या समृद्धीसाठी हे शुभ मानले जाते.
सकाळी स्वच्छ स्नान सडा पाणी करायलाच हवे.कळस हे आर्थिकतेचे म्हणजेच संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अध्यात्मिक दृष्टिकोनातून, हे शुक्र आणि चंद्राचे प्रतीक आहे आणि गणेशाच्या रूपात त्याची पूजा केली जाते.
त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर दररोज कळस भरून ठेवल्यास गणेशाच्या कृपेने शुभ लाभ मिळतो. लोटा किंवा कळस जे काही ठेवाल त्याचे तोंड रुंद असावे. दररोज सकाळी आंघोळीनंतर कळस पूर्ण भरून ठेवा आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्याही टाकू शकता.
असे केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित होते. हे पाणी दररोज बदलले पाहिजे.कोणत्याही शुभ कार्यापूर्वी किंवा सणाच्या आधी असे म्हणतात की, तोरण लावल्याने तुमच्या घरातील सर्व शुभ कार्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरक्षितपणे पूर्ण होतात.
आंब्याची पाने उत्तम असून अशोकाच्या पानांपासूनही हे तोरण बनवता येतात. वास्तूमध्ये असे मानले जाते की सणांव्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी घरात तोरण लावल्यास खूप शुभ परिणाम प्राप्त होतात.
मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला लाल, पिवळा किंवा निळा स्वस्तिक बनवावा. किंवा तुम्हाला हवे असल्यास बाजारातून बनवलेले स्वस्तिक आणून मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावू शकता.
मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशा दोष दूर होतात. दुसरीकडे मुख्य दरवाजाच्या अगदी वर मध्यभागी निळा स्वस्तिक लावल्याने घरातील लोक वाईट नजरेपासून दूर राहतात.
घराबाहेर कचरा काढून पानी शिंपडा यामुळे एक प्रसन्न वातावरण निर्माण होईल ज्यामुळे सकाळ प्रसन्न होईल मग पुर्ण दिवस छान जाईल मन प्रसन्न झाल्यामुळे कामे होतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.