नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, हिंदू धर्मात घरामध्ये कासव असणे किंवा ठेवणे शुभ मानले जाते. हिंदु धर्म मान्यतेनुसार प्रभू विष्णुंच एक रुप कासव होते. भगवान श्री विष्णूंनी कासवाचे रुप धारण करुन समुद्र मंथन मध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यादरम्यान मंदार पर्वत आपल्या कवचावर सांभाळले होते.
हिंदू धर्मातील ग्रंथानुसार जिथे कासव असतं तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटलं जातं. हे कासव आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवला जातो. परंतू त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेत ठेवला असेल. नाहीतर अशुभ परिणाम होऊ शकतात.
मग त्याने घराची अधोगती होऊ शकते.कासव घरी ठेवल्याने धन प्राप्ती होते. धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात. पण या साठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे. तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीघार्यु प्राप्त होते आणि आजारापासून मुक्तीदेखील मिळते.
असे फायदे या कासव घरामध्ये योग्य दिशेला ठेवल्याने होतात. आपण आपल्या घरामध्ये कासव आणून त्याला योग्य ती विधी करून योग्य जागी ठेवल्याने आपल्याला नोकरी आणि परीक्षेत पण यश मिळू लागतं. कासव हे आपल्या कुटुंबाला लोकांच्या वाईट नजरेपासून देखील वाचवतं. याने घरात सुख-शांती नांदते.
तसेच पैसा येण्याचे मार्ग अधिक निर्माण होतात. पण हिंदु धर्मात या कासवाला घरात किंवा आपल्या व्यापारामध्ये योग्य जागी ठेवल्यास खुप फायदा होतो व अयोग्य ठिकाणी ठेवल्यास तोटा!
आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी हे कासव उत्तरेकडे तोंड करून ठेवा. या दिशेला कासव असल्यास व्यापारात धन आणि पैसा या दोन्ही मध्ये वाढ होत जाते. या जगात सर्व जीवांमध्ये सर्वात जास्त कासव जगते आणि हे जसजसे मोठे होते तसे त्याचा आकार ही मोठा होत जातो.
यामुळे याला व्यापारात उत्तर दिशेला ठेवले जाते. धातूपासून बनलेले कासव पाण्याच्या वाटीत ठेऊन आपल्या घराच्या उत्तर दिशेला देवावे. घरामध्ये कासव हे ठेवण्यासाठी उत्तर दिशा महत्त्वाचे मानली जाते.
जर तुमच्या घरात उत्तर दिशेला तुमची बेडरूम असेल तर चुकूनही पाण्याने भरलेल्या वाटीतील कासव त्या दिशेला ठेऊ नका. त्या दिशेला फक्त धातूचे चा कासव ठेवावे. फेंगशुई च्या नियमना नुसार तुमच्या बेडरूममध्ये पाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते.
धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात. पण या साठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे. तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीघार्यु प्राप्त होते आणि आजारापासून मुक्तीदेखील मिळते.
तुम्ही कासवाची प्रतिमा, चित्र देखील उत्तरेला लावू शकता. कासव हे दीर्घायु असते, कासवकडून बरेच गन घेण्यासारखे असतात, तसेच समुद्र मंथनवेळी कासव देखील देवतांसोबत होते म्हणूनच कासव प्रत्येक मंदिरात पूजनीय आहे.
क्रिस्टल कासव हे घरात उत्तर दिशेला ठेवले जाते, तसेतर सर्व प्रकारचे कासव उत्तरेला मुख करून ठेवल्याने जीवनात उत्तरोतर प्रगती होते. कासव चुकूनही बेड रूम मध्ये ठेवू नका, हॉल मध्ये किंवा किचन मध्ये उत्तरेला मुख करून ठेवा.
काहीजण धातूचे कासव वापरतात, चांदी, कांस्य, पितळ यांचेही कासव शुभ मानले जाते, तसेच हर कासवाच्या पोटाखाली जर मन्त्र असेल तर ते अतिशय शुभ असते.
कासव घरी स्थापन करताना चांगली तिथी, मुहूर्त पहावा, कासव घरी आणण्यासाठी बुधवार, शुक्रवार ता दिवशी आणावे तसेच इतर कोणत्याही शुभ मुहूर्तावर आणले तरी चालते.
कासव घरी आणल्यावर शुद्ध जलाने स्वछ धुवावे व त्यासाठी एक पात्रदेखील अवश्य असावे, तसेच त्याला अभिषेक घालून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा, अभिषेक करून नंतर पूजा करून अक्षता फुल वहा व पात्रात पाणी घालून कासवाची स्थापना करावी व त्यानंतर हे कासव उत्तर दिशेला मुख करून ठेवा.
कासवाच्या निगडित जे नियम किंवा कोणत्याही दिशेविषय माहीती ही फेंगशुईच्या माध्यमातून मिळवली जाते. या कासवाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. त्यामुळे त्याला आपल्या घरात किंवा ऑफिस मध्ये ठेवने शुभ मानले जाते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.